अहमदाबाद - आयपीएल २०२१ मध्ये आज डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत आहे. कोलकाताचा संघ गुणतालिकेत ५ व्या तर दिल्ली तिसऱ्या स्थानी आहे. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून केकेआरला फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
दिल्लीने आपल्या संघात एक बदल केला आहे. त्यांनी अमित मिश्राला विश्रांती देत त्याच्या जागेवर अष्टपैलू ललित यादवला अंतिम संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे कोलकाताने आपला मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे.
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत २६ सामने झाली आहेत. यात कोलकाता संघाने १४ सामने जिंकली आहेत. तर दिल्लीचा संघ ११ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. एका सामन्याचा निकाल लागू शकले नाही.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टिव्ह स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, ललित यादव, कगिसो रबाडा, इशांत शर्मा आणि आवेश खान.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ -
शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, सुनील नरेन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.
हेही वाचा - IPL २०२१ : कौतुकास्पद!, राजस्थान रॉयल्सकडून कोरोना लढ्यात ७.५ कोटींची मदत जाहीर
हेही वाचा - IPL २०२१ : खेळाडूंनंतर आता 'या' २ पंचांनी घेतली आयपीएलमधून माघार