दुबई - राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्सचा संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात विजयी लय मिळवण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईने 12 पैकी 18 गुण मिळवत प्ले ऑफ फेरी गाठली आहे. ते गुणतालिकेत अव्वलस्थानी आहेत. तर दुसरीकडे दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.
चेन्नईचा सलामीवीर ऋुतुराज गायकवाडने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 60 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली होती. पण मधल्या फळीतील अंबाटी रायुडू, सुरेश रैना आणि धोनी धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या गोलंदाजाची चांगली कामगिरी केली आहे.
दुसरीकडे दिल्लीचा संघ देखील तुफान फॉर्मात आहे. मागील काही सामन्यात शिखर धवनला मोठी खेळी करता आलेली नाही. स्टिव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत सातत्याने धावा करत आहेत. गोलंदाजी आर. अश्विन, अक्षर पटेलने चांगला मारा केला आहे. त्यांना एनरिक नार्खिया, कगिसो रबाडा आणि आवेश खान या वेगवान तिकडीची चांगली साथ मिळाली आहे.
चेन्नई-दिल्ली हेड टू हेड आकडेवारी -
उभय संघात आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. यातील 15 सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. तर राहिलेले 9 सामने दिल्लीने जिंकली आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा संभाव्य संघ -
ऋुतुराज गायकवाड, फाफ डू प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाटी रायुडू, एम एस धोनी (कर्णधार), रविद्र जडेजा, सॅम कुरेन/ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, केएम आसिफ/दीपक चाहर, जोश हेजलवूड.
दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ -
पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टिव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), शिमरोन हेटमायर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान आणि एनरिख नार्खिया.
हेही वाचा - KKR VS SRH : कोलकाताचा हैदराबादवर सहा गडी राखून विजय
हेही वाचा - ICC T20 WC 2021: स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशाबाबत मोठा निर्णय