चेन्नई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रविवारी सामना पार पडला. या सामन्यात बंगळुरू संघाने कोलकातावर ३८ धावांनी विजय मिळवला. बंगळुरूच्या विजयात ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी आक्रमक वैयक्तिक अर्धशतके झळकावत मोलाची भूमिका निभावली. या दोघांमधील भागिदारीदरम्यानचा एक किस्सा डिव्हिलियर्सने सांगितला.
सामना संपल्यानंतर डिव्हिलियर्स चहलशी बोलताना म्हणाला की, 'ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी दरम्यान थकला होता. जेव्हा मी क्रीजवर गेलो, तेव्हा त्याने मला सांगितलं की, मी जास्त धावा पळू शकत नाही. पण मी दोन रन आणि तीन रन धावण्याचा धडाका लावला. तेव्हा मॅक्सवेल माझ्यावर रागावला होता.'
-
🎤 Chahal chats up with 'Mr. 360' ABD 🎤@yuzi_chahal is back on mic duties as he interviews @ABdeVilliers17 on his 7⃣6⃣*-run blitz, his partnership with @Gmaxi_32 & more. 😎😎 - By @28anand#VIVOIPL #RCBvKKR @RCBTweets
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Watch the full interview 🎥👇https://t.co/x871aJvcrC pic.twitter.com/Pfs1qyaU4O
">🎤 Chahal chats up with 'Mr. 360' ABD 🎤@yuzi_chahal is back on mic duties as he interviews @ABdeVilliers17 on his 7⃣6⃣*-run blitz, his partnership with @Gmaxi_32 & more. 😎😎 - By @28anand#VIVOIPL #RCBvKKR @RCBTweets
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
Watch the full interview 🎥👇https://t.co/x871aJvcrC pic.twitter.com/Pfs1qyaU4O🎤 Chahal chats up with 'Mr. 360' ABD 🎤@yuzi_chahal is back on mic duties as he interviews @ABdeVilliers17 on his 7⃣6⃣*-run blitz, his partnership with @Gmaxi_32 & more. 😎😎 - By @28anand#VIVOIPL #RCBvKKR @RCBTweets
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
Watch the full interview 🎥👇https://t.co/x871aJvcrC pic.twitter.com/Pfs1qyaU4O
दरम्यान डिव्हिलियर्स डावाच्या १२ व्या षटकात फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा संघाची धावसंख्या ३ बाद ९५ अशी होती. यावेळी मॅक्सवेल नाबाद ६० धावांवर खेळत होता. मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्स या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५३ धावांची भागिदारी केली.
मॅक्सवेल ७८ धावांवर बाद झाल्यानंतर डिव्हिलियर्सने डावाची सूत्रे हाती घेत केकेआरच्या गोलंदाजांना चोपलं. त्याने नाबाद ७६ धावांची खेळी केली. मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्स यांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरू संघाला २०४ धावा धावफलकावर लावत्या आल्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरचा संघ २० षटकात ८ बाद १६६ धावा करू शकला आणि बंगळुरू संघाने हा सामना ३८ धावांनी जिंकला.
हेही वाचा - IPL २०२१: सॅमसनचा सामना धोनीशी; पाहा कोणाचा पगडा भारी
हेही वाचा - IPL २०२१ : आतापर्यंत पाहिलेलं हे सर्वात विचित्र नेतृत्व, गंभीरने मॉर्गनला फटकारलं