ETV Bharat / sports

राजस्थान रॉयल्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

कोलकाताविरुद्धच्या पराभवासोबतच राजस्थानच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. गुणतालिकेत पहिल्यांदा राजस्थानला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिवाय, आयपीएल विजेता संघ तळाला राहण्याचेही हे पहिलेच वर्ष ठरले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थानने विजेतेपद मिळवले होते.

rajasthan royals registers embarrassing record in ipl history
राजस्थान रॉयल्सच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
author img

By

Published : Nov 2, 2020, 5:45 PM IST

दुबई - आयपीएलमध्ये आता काही सामने बाकी असून फक्त मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर बंगळुरू, कोलकाता आणि द्लील यांनी बाद फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. कालच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर ६० धावांनी मात केली. या पराभवासोबत राजस्थानचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. राजस्थानच्या संघाला १२ गुणांसह गुणतालिकेत शेवटचे स्थान मिळाले. आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात तळाच्या संघाला मिळालेले हे सर्वात जास्त गुण ठरले.

कोलकाताविरुद्धच्या पराभवासोबतच राजस्थानच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. गुणतालिकेत पहिल्यांदा राजस्थानला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिवाय, आयपीएल विजेता संघ तळाला राहण्याचेही हे पहिलेच वर्ष ठरले. आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थानने विजेतेपद मिळवले होते.

  • Rajasthan Royals finish last on Points Table for the first time in their IPL journey.

    This is also the first time a former IPL champion has finished last! #IPL2020

    — Bharath Seervi (@SeerviBharath) November 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोलकाताचे राजस्थानला होते १९२ धावांचे आव्हान -

कर्णधार इयान मॉर्गनने केलेल्या भन्नाट खेळीमुळे कोलकाताने राजस्थानला १९२ धावांचे आव्हान दिले होते. त्याबदल्यात राजस्थानच्या संघ २० षटकांत ९ बाद १३१ धावा करू शकला. राजस्थानकडून फलंदाजी करताना जोस बटलरने 22 चेंडूंत १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ३५ धावा केल्या. राहुल तेवतियाने २७ चेंडूंत १ षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. तर त्यापाठोपाठ श्रेयस गोपाळ याने २३ चेंडूत नाबाद २३, बेन स्टोक्सने ११ चेंडूंत १८, जोफ्रा आर्चरने ६, स्टिव्ह स्मिथने ४, कार्तिक त्यागीने २, संजू सॅमननने १ धाव काढली. रियाग पराग शून्यावरच बाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले. याप्रकारे राजस्थानचा संघ २० षटकांत ९ बाद १३१ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.