अबुधाबी - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी एका निराळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या बूटावर लिहिलेल्या सेल्फनोटमुळे सध्या सैनी चर्चेत आला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ३ सप्टेंबरला राजस्थान रॉयल्यविरुद्ध सामना खेळला. या सामन्यात सैनीने राजस्थानच्या राहुल तेवतियाला एक बिमर चेंडू टाकला. तो चेंडू तेवतियाच्या मानेला लागल्याने तो खाली पडला. त्यावेळी सैनीने स्वत: जाऊन तेवतियाची विचारपूस केली. त्यावेळी सैनीच्या बूटवर लिहिलेली एक सेल्फनोट क्रिकेट चाहत्यांच्या नजरेस पडली.'फ* इट! बोल फास्ट' असे त्याच्या बूटवर लिहिलेले आहे.
-
Match 4: RR vs RCB pic.twitter.com/RGsX5nuVOW
— Navdeep Saini (@navdeepsaini96) October 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Match 4: RR vs RCB pic.twitter.com/RGsX5nuVOW
— Navdeep Saini (@navdeepsaini96) October 3, 2020Match 4: RR vs RCB pic.twitter.com/RGsX5nuVOW
— Navdeep Saini (@navdeepsaini96) October 3, 2020
यापूर्वीही क्रिकेटमध्ये असे प्रकार निदर्शनास आले आहेत. २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क यानेही आपल्या हातातील बँडवर अशीच एक सेल्फनोट लिहिली होती. डिसेंबर २०१९मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत कॅमेऱ्याने ही नोट कैद केली होती.