नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन भन्नाट फॉर्मात आहे. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात संजूने ४२ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत संजूने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. त्याच्या खेळीमुळे राजस्थानसाठी अशक्यप्राय वाटणारा विजय सोपा झाला. सातत्यपूर्ण खेळीमुळे महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांना सॅमसनविषयी एक प्रश्न पडला आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटवरुन संजूबद्दल एक प्रश्न विचारला आहे. सॅमसन नावाचा सभ्य गृहस्थ नक्की जेवणात काय खातो यासंदर्भातील माहिती मला कोणी देऊ शकेल का?, असा प्रश्न महिंद्रा यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
-
Can someone please share with me what exactly this gentleman Samson’s daily diet is..? https://t.co/0jLnFKfYtU
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Can someone please share with me what exactly this gentleman Samson’s daily diet is..? https://t.co/0jLnFKfYtU
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2020Can someone please share with me what exactly this gentleman Samson’s daily diet is..? https://t.co/0jLnFKfYtU
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2020
या ट्विटशिवाय महिंद्रा यांनी अजून एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले, ''ज्यांनी हा सामना पाहिला असेल, त्या प्रत्येकाला समजेल की, लाखो लोक आयपीएलचे का अनुसरण करतात. आयुष्यभर उपयोगी पडतील, असे धडे येथे मिळतात. कधीच हार मानू नका. कधीच एखादे काम अर्ध्यात सोडून का. काहीही घडू शकते, यावर विश्वास ठेवा. अमर्याद शक्यतांचा विचार करा.''
-
Everyone who watched this match will understand why millions of eyeballs follow the #IPL. Lessons for life are not in short supply here. Never give in. Never write anyone off. Anything is possible. Accept no limits. Start the week with that spirit. https://t.co/56PqCrSgKw
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Everyone who watched this match will understand why millions of eyeballs follow the #IPL. Lessons for life are not in short supply here. Never give in. Never write anyone off. Anything is possible. Accept no limits. Start the week with that spirit. https://t.co/56PqCrSgKw
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2020Everyone who watched this match will understand why millions of eyeballs follow the #IPL. Lessons for life are not in short supply here. Never give in. Never write anyone off. Anything is possible. Accept no limits. Start the week with that spirit. https://t.co/56PqCrSgKw
— anand mahindra (@anandmahindra) September 27, 2020
चेन्नईविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही संजूने तडाखेबंद फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने गोलंदाजांची पिसे काढत ३२ चेंडूत ७४ धावा कुटल्या होत्या. यात त्याने ९ उत्तुंग षटकार लगावले होते.