बंगळुरू - मुंबई इंडियन्सविरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएलमध्ये गुरुवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात बंगळुरुला 6 धावांनी पराभव स्विकारावा लागला. असे असले तरी, या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने या दोघांनी आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
आयपीएलमध्ये मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने 32 चेंडूत 46 धावांची खेळी करत 5हजार धावांचा टप्पा पार केला. आयपीएलमध्ये 5 हजार धावा करणार विराट हा चेन्नईच्या सुरेश रैनानंतरचा दुसराच खेळाडू आहे.
याच सामन्यात विराट कोहलीचा संघसहकारी एबी डिव्हिलियर्सनेही 41 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी करत आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 4 हजार धावा पूर्ण करणारा डीविलियर्स हा तिसरा विदेशी खेळांडू ठरला आहे.
![AB de Villiers](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/d2w6xpdukaavvlg_2903newsroom_00001_174.jpg)
विराटला 5 हजार धावा करण्यासाठी 165 सामने खेळावे लागले तर डिव्हिलियर्सला 4 हजारी मनसबदार व्हायला 143 सामने खेळावे लागले.