ETV Bharat / sports

पिंक बॉल कसोटी : स्मृती मंधानाचे पहिले कसोटी शतक; भारताची मजबूत स्थितीकडे वाटचाल - pink ball test

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दिवसरात्र कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावित भारताला मजबूत स्थितीत पोहोचविले आहे. स्मृतीने सामन्यात शानदार 127 धावांची खेळी साकारली आहे.

पिंक बॉल कसोटी : स्मृती मंधानाचे पहिले कसोटी शतक; भारताची मजबूत स्थितीकडे वाटचाल

author img

By

Published : Oct 1, 2021, 12:39 PM IST

गोल्ड कोस्ट(क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया) : पिंक बॉल कसोटीतील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दिवसरात्र कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावित भारताला मजबूत स्थितीत पोहोचविले आहे. स्मृतीने सामन्यात शानदार 127 धावांची खेळी साकारली आहे.

स्मृतीचे पहिले कसोटी शतक

स्मृतीने 216 चेंडूंचा सामना करताना 58.79 च्या स्ट्राईक रेटने 127 धावांचे योगदान संघाच्या धावफलकात दिले. स्मृतीने या धडाकेबाज खेळीत एकूण 22 चौकार आणि 1 षटकार मारला. अॅशले गार्डनरच्या चेंडूवर ताहलिया मॅकग्राथकडून स्मृती झेलबाद झाली. स्मृतीचे हे पहिलेच कसोटी शतक आहे. या शतकी खेळीत तिला पूनम राऊत आणि शेफाली वर्मा या दोघींनी चांगली साथ दिली. पूनमने 36 तर शेफालीने 31 धावांचे योगदान दिले.

मिताली राजकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

सध्या भारताकडून कर्णधार मिताली राज 15 तर यस्तिका भाटिया 2 धावांवर खेळत आहे. दुसऱ्या दिवशी 84 षटकानंतर भारतीय संघाच्या 3 बाद 231 धावा झाल्या आहेत.

हेही वाचा - IND W vs AUS W: भारताच्या लंचपर्यंत 1 बाद 101 धावा; स्मृतीचे नाबाद अर्धशतक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.