आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) आगामी दौऱ्याचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत आगामी 2031 पर्यंतचे पुरुषांच्या जागतिक स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. यामध्ये 8 टुर्नामेंट ठरवण्यात आल्या आहेत. जगभरातील 12 वेगवेगळे देश याचे यजमानपद स्वीकारणार आहेत. चँपीयन्स ट्रॉफी परत एकदा क्रिकेट रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.
-
Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
— ICC (@ICC) November 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Eight new tournaments announced 🔥
14 different host nations confirmed 🌏
Champions Trophy officially returns 🙌https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F
">Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
— ICC (@ICC) November 16, 2021
Eight new tournaments announced 🔥
14 different host nations confirmed 🌏
Champions Trophy officially returns 🙌https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92FAre you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
— ICC (@ICC) November 16, 2021
Eight new tournaments announced 🔥
14 different host nations confirmed 🌏
Champions Trophy officially returns 🙌https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F
भारतीय क्रिकेट बोर्ड 2026 चा टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेच्या सहकार्याने करणार आहे. 2029 मध्ये चँपीयन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन भारत करेल. तर 2031 ची विश्वचषक स्पर्धा भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड संयुक्तपणे करणार आहे.
2024 मध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचे आयोजन यूएसए क्रिकेट आणि क्रिकेट वेस्ट इंडीज संयुक्तपणे करणार आहेत. 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची अपेक्षा ICC बाळगून आहे. याचीच रंगीत तालीम म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवीन अध्यक्ष रमिझ राजा यांनी चँपीयन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून 2025 ची चँपीयन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. 1996 नंतर तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानला यजमानपद मिळाले आहे.
हेही वाचा - 'सुमन एंटरटेन्मेंट'च्या पहिल्या हिंदी गाण्यात झळकणार मराठी अभिनेत्री पूजा सावंत!