ETV Bharat / sports

IND vs NZ Second Test 1st day: मयंक अग्रवालच्या झुंझार शतकी खेळीने भारताची धावसंख्या 4 गडी बाद 221

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा (India vs New Zealand 2nd Test)आज पहिला दिवस वानखेडे स्टेडियमवर निर्विघ्न पार पडला. सलामीला येऊन मयंक अग्रवालने दमदार सुरुवात केल्यानंतर 14 चौकार आणि 4 षटकार ठोकत जबरदस्त शतक झळकावले. पहिल्या दिवस अखेरीस भारतीय संघाची धावसंख्या 4 गडी बाद 221 झाली.

मयंक अग्रवालची शतकी खेळी
मयंक अग्रवालची शतकी खेळी
author img

By

Published : Dec 3, 2021, 6:41 PM IST

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्याचा (India vs New Zealand 2nd Test) आज पहिला दिवस वानखेडे स्टेडियमवर निर्विघ्न पार पडला. पावसाच्या शक्यतेमुळे या सामन्यावर एक संटक आले होते. सकाळी खेळ सुरू होण्यास विलंब झाला पण दिवसभर पावसाने खेळात व्यत्यय आणला नाही. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यानंतर सलामीवीर मयंक अग्रवाल आणि शुबमन गिल यांनी सावध फलंदाजीला सुरूवात केली. या जोडीने अर्धशतकीय भागीदार केल्यानंतर संघाची धावसंख्या 81 असताना एजाज पटेलने शुबमन गिलला चकवले. वयैक्तीक 44 धावावर खेळणाऱ्या गिलने रॉस टेलरच्या हाती झेल दिला आणि तंबूत माघारी परतला.

एजाज पटेलच्या फिरकीची कमाल

शुबमन गिलचा पहिला बळी घेतल्यानंतर न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेलची मैदानावर दहशत पाहायला मिळाली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या दिग्गज फलंदाजांना खातेही उघडू न देता एजाजने माघारी धाडले. पुजाराला एजाजने क्लिन बोल्ड केले तर विराटला एलबीडब्लू करुन तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आमि मयंक अग्रवाल यांनी पुन्हा चांगली भागेदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतू श्रेयस वयैक्तीक 18 धावावर खेळत असताना एजाज पटेलच्या फिरकीने त्याला चकवले आणि टॉम ब्लंडेलच्या हाती झेल देऊन तो माघारी फिरला. भारताची धावसंख्या 160 असताना श्रेयसने मैदान सोडले.

मयंक अग्रवालची शतकी खेळी

सलामीला येऊन मयंक अग्रवालने दमदार सुरुवात केल्यानंतर 14 चौकार आमि 4 षटकार ठोकत जबरदस्त शतक झळकावले. खेळ संपत असताना मयंक 120 धावावर नाबाद राहिला. वृध्दिमान साहाने नाबाद 25 धावा काढत त्याला चांगली साथ दिली. साहानेही 3 चौकार व 1 षटकार ठोकला. त्यामुळे पहिल्या दिवस अखेरीस भारतीय संघाची धावसंख्या 4 गडी बाद 221 झाली.

हेही वाचा - Kangana Ranaut Apologizes : कंगना रणौतच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव, अभिनेत्रीने मागितली माफी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.