मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. शुक्रवार 3 डिसेंबरपासून या सामन्याला सुरूवात होईल. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात तरी विजय मिऴून भारतीय संघ विजेता ठरेल अशी क्रिकेटचे चाहते आशा बाळगून आहेत. मात्र सामना सुरू होणार की नाही यावर आता प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.
सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाचे वातावरण निश्चित असल्यामुळे सामना सुरू होणार नाही अशीच सद्य स्थिती आहे. बुधवारी दोन्ही संघांना पावसामुळे सराव सत्र रद्द करावे लागले होते. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. पूर्व किनारपट्टीलाही 'जवाद' चक्रीवादळाचा इशारादेण्यात आला आहे. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. शनिवारी हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सून संपल्यानंतर हे पहिलेच चक्रीवादळ आहे. उद्या (शुक्रवारी) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबई कसोटीसाठी दोन्ही संघ तयार असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एकही चेंडूचा खेळ होणार नाही अशीच शक्यता दिसते. उद्या म्हणजे शुक्रवारी पहिल्याच दिवशी पावसाची शक्यता आहे. बुधवारी दोन्ही संघांना पावसामुळे सराव सत्र रद्द करावे लागले होते.
कसोटी सामन्याच्या उर्वरित पाचही दिवसाच्या काळात पावसाची शक्यता आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खेळपट्टीच्या आत ओलावा असेल. यामुळेच जलद गोलंदाजांना कानपूर पेक्षा अधिक मदत मिळू शकते. त्याच बरोबर फिरकीपटूंना अतिरिक्त टर्नचा फायदा मिळू शकतो.
दरम्यान भारतीय संघात कोणते बदल केले जातील याकडे सर्वांचे लक्ष्य असेल. अंतिम ११ मध्ये विराट कोहलीचा समावेश होणार आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या अजिंक्य रहाणे या सामन्यात खेळणार का हाही एक मुद्दा असेल. जखमी वृद्धिमान साहाचे खेळणेही निश्चित मानले जात नाही. भरत श्रीकरला सलामीला संधी मिळू शकेल असे चित्र आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.
हेही वाचा - Ipl Retention List 2022 : बंगळुरूने कोहली आणि चेन्नईने धोनीसह 'या' खेळाडूंना केले रिटेन