जोहान्सबर्ग - भारताचा पहिला डाव 202 धावामध्ये संपला आहे. कर्णधार केएल राहुलने केलेल्या 50 धावा व रविचंद्रन अश्विनच्या 46 धावांच्या खेळीमुळे भारत दोनशे धावांचा टप्पा ओलांडू शकला. कागिसो रबाडा आणि डुआन ऑलिव्हियर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर मार्को जॅन्सनने चार गडी बाद करुन आपले वर्चस्व सिध्द केले. दक्षिण आफ्रिका संघाच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे.
भारताचा पहिला डाव 202 धावात आटोपल्याने दक्षिण आफ्रिका संघाला या सामना जिंकून 1-1 असी बरोबरी करण्याची संधी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव, पहिल्या दिवस अखेरीस 1 बाद 35 धावा
आफ्रिकेचे सलामीवीर डीन एल्गर आणि एडन मार्कराम यांनी डावाला सुरुवात केली. परंतु संघाच्या 14 धावा फलकावर असतानाच एडन मार्करामला मोहम्मद शामीने पायचित केले. तो केवळ 7 धावा काढून तंबूत परतला आहे.
सलामीवीर डीन एल्गरच्या साथीला आता कीगन पीटरसन उतरला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस द. आफ्रिका संघाने पहिल्या डावात 18 षटकांचा सामना करीत 1 बाद 35 धावा केल्या आहेत. डीन एल्गर 11 धावावर खेळत असून कीगन पीटरसनने 14 धावा केल्या आहेत.
आजच्या दिवसात द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि भारताला मोठी धावसंख्या उभा करण्यापासून यशस्वी रोखले. दक्षिण आफ्रिकेने 1 बाद 35 धावा केल्या केल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द. आफ्रिकन फलंदाजांना रोखण्यात भारताला कितपत यश मिळतं पाहावं लागणार आहे.
भारताच्या पहिल्या डावाबद्दल सविस्तर वाचा - Ind South Africa 2nd Test :पहिल्या दिवसावर आफ्रिकन गोलंदाजांचे वर्चस्व, भारत सर्वबाद 202
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
डीन एल्गर (क), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (डब्ल्यू), मार्को जॅन्सन, कागिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी
भारत (प्लेइंग इलेव्हन):
केएल राहुल (क), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (पंत), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज