गोल्ड कोस्ट - स्मृती मंधानाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे नाइट कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या लंच पर्यंत 1 बाद 101 धावा केल्या आहेत. स्मृतीन मंधाना 112 चेंडूत 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा स्मृती मंधाना आणि शफाली वर्माने 93 धावांची आश्वासक सलामी दिली. यात शफलीने 64 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. शफाली आणि मंधाना जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर वरचष्मा राखला. दोघांनी मैदानाच्या चौफेर आकर्षक फटके मारले. नेहमी आक्रमक खेळ करणाऱ्या शफालीने सावध खेळ केला.
-
That's Dinner on Day 1 of the #AUSvIND Pink-Ball Test!
— BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
6⃣4⃣* for @mandhana_smriti
1⃣* for @raut_punam
3⃣1⃣ for @TheShafaliVerma
The second session of the Day to begin soon. #TeamIndia
Scorecrd 👉 https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/4dY0Nrm3fd
">That's Dinner on Day 1 of the #AUSvIND Pink-Ball Test!
— BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2021
6⃣4⃣* for @mandhana_smriti
1⃣* for @raut_punam
3⃣1⃣ for @TheShafaliVerma
The second session of the Day to begin soon. #TeamIndia
Scorecrd 👉 https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/4dY0Nrm3fdThat's Dinner on Day 1 of the #AUSvIND Pink-Ball Test!
— BCCI Women (@BCCIWomen) September 30, 2021
6⃣4⃣* for @mandhana_smriti
1⃣* for @raut_punam
3⃣1⃣ for @TheShafaliVerma
The second session of the Day to begin soon. #TeamIndia
Scorecrd 👉 https://t.co/seh1NVa8gu pic.twitter.com/4dY0Nrm3fd
सोफी मोलिनूक्सने शफालीला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. तिने 4 चौकारांसह 31 धावा केल्या. शफालीचा झेल मॅकग्राने मिडऑफवर टिपला. विशेष म्हणजे शफालीला दोन वेळा जीवदान मिळाले. पण ती मोठी खेळी करतण्यात अपयशी ठरली. दुसरी बाजू स्मृतीने लावून धरली. या दरम्यान, तिने आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटीत पदार्पण केलेल्या डार्सी ब्राउनच्या गोलंदाजीवर स्मृती बरसली.
ताहिला मॅकग्राच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मंधानाने आपले अर्धशतक वेगाने पूर्ण केले. यानंतर तिने सावध खेळ केला. तिने पुढील 14 धावा करण्यासाठी 64 चेंडू खर्च केले. दुसऱ्या बाजूने पूनम राऊत एक धावा काढून नाबाद राहिली.
हेही वाचा - IPL 2021 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने मोडला विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड
हेही वाचा - RCB VS RR : बंगळुरुची राजस्थानवर ७ गड्यांनी मात; ग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी