नवी दिल्ली: भारतीय संघासाठी पुढील काही महिने खूप व्यस्त असणार आहेत. संघ पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर ( IND Tour Of ZIM ) जाईल. हा सहा वर्षांतील त्यांचा पहिला दौरा असणार आहे. 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी हरारे येथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. केएल राहुल संघाचे नेतृत्व करू शकतो. ही मालिका आयसीसी पुरुष विश्वचषक सुपर लीगचा ( ICC Men's World Cup Super League ) भाग आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकासाठी 13 संघांची स्पर्धा थेट पात्रतेचा मुख्य स्त्रोत आहे.
झिम्बाब्वे सध्या 13 संघांपैकी 12 व्या क्रमांकावर ( Zimbabwe currently ranked 12th ) आहे. भारतीय संघाने शेवटचा झिम्बाब्वेचा दौरा 2016 मध्ये केला होता. जेव्हा संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले होते. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला यजमानांविरुद्ध तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकतो. विराटला लयीत आणण्यासाठी निवडकर्ते झिम्बाब्वे दौऱ्यावर पाठवू शकतात, असे मानले जात आहे. कोहली सध्या विश्रांती घेतल्यामुळे टीम इंडियातून बाहेर आहे. भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यातून कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत आशिया चषकापूर्वी तो गमावलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळू शकतो.
भारतीय संघ आगामी एकदिवसीय सामन्यापासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेला ( IND vs WI ODI Series ) सुरुवात करणार आहे. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 जुलै रोजी होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दुसरीकडे, भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी झिम्बाब्वे संघ 30 जुलैपासून बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.