ETV Bharat / sports

IPL 2022 Point Table : आयपीएलच्या 23 सामन्यानंतर अशी आहे गुणतालिका, जाणून घ्या एका क्लिकवर

author img

By

Published : Apr 14, 2022, 8:51 PM IST

राजस्थान रॉयल्स सध्या आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत ( IPL 2022 Point Table ) चार सामन्यांत सहा गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच मुंबई इंडियन्स सलग पाचव्या पराभवानंतर गुणतालिकेत तळाशी आहे.

IPL
IPL

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) 15 व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सलग पाच सामने गमावले आहेत. 23व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या नऊ विकेट्सवर 186 धावा झाल्या आणि 12 धावांनी सामना गमावला. पीबीकेएसकडून शिखर धवन (70) आणि मयंक अग्रवाल (52) यांनी अर्धशतके झळकावली, तर ओडियन स्मिथने 30 धावांत चार बळी घेतले. त्यानंतर गुणतालिकेत काही बदल झाले आहेत.

सध्या राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals ) संघ चार सामन्यांतून सहा गुणांसह आयपीएल 2022 गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ कोलकाता नाइट रायडर्स (KKR) दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स समान गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर (सहा गुण) आहे. यानंतर लखनौ सुपर जायंट्सचेही सहा गुण झाले असून ते चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स (सहा गुण) समान गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

IPL 2022 Point Table
IPL 2022 Point Table

तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) सहाव्या स्थानावर आहे आणि त्यांचे आतापर्यंत सहा गुण आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी चार गुणांसह सातव्या आणि आठव्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्ज दोन गुणांसह नवव्या स्थानावर आहे, तर मुंबई गुणतालिकेत तळाशी आहे. मुंबई इंडियन्सने त्यांचे पाचही सामने गमावले आहेत, तर चेन्नईने पाचपैकी एक सामना जिंकला आहे.

सहा गुण मिळविणाऱ्या गुजरात टायटन्सचा नेट रन रेट 0.097 आहे. त्याच वेळी, आरसीबीचा नेट रन रेट 0.006 आहे. दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals ) नेट रन रेट 0.476 आहे. पण त्यांच्याकडे फक्त चार गुण आहेत. सनरायझर्स हैदराबादचा नेट रन रेट -0.501 आहे. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा नेट रन रेट -0745 आहे. पॉइंट टेबलच्या तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट -1.072 आहे.

हेही वाचा - World Junior Shooting Competition : जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनुष्काची भारतीय संघात निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.