ETV Bharat / sports

Umesh Yadav Father Death : क्रिकेटपटू उमेश यादवच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादववर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. उमेश यादवला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनवण्यात वडील टिळक यादव यांचा मोठा वाटा होता.

Umesh Yadav Father Death
उमेश यादवच्या वडिलांचे निधन
author img

By

Published : Feb 24, 2023, 12:41 PM IST

नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचे वडील तिलक यादव यांचे बुधवारी निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. उमेश यादव यांचे वडील गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उमेश यादवला भारतीय संघाचा भाग बनवण्यात त्याचे वडील टिळक यादव यांचा मोठा वाटा होता. या दुःखाच्या प्रसंगी क्रिकेटपटू मोहम्मद सिराज याने उमेश यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.

  • My condolences to @y_umesh bhai and family, a huge loss for anyone 😢 Stay strong mere bhai, and I pray for more strength during these difficult times 🤲

    — Mohammed Siraj (@mdsirajofficial) February 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोळसा खाणीत काम करायचे : उमेश यादव याचे वडील टिळक यादव यांचा जन्म उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात झाला होता. टिळक यादव हे तरुणपणी नावाजलेले पैलवान होते. कोळसा खाणीत काम करण्यासाठी ते नागपुरात स्थलांतरित झाले. टिळक यादव यांनी त्यांचा मुलगा उमेशचे भारतीय क्रिकेट संघाचा भाग बनण्याचे स्वप्न कोळसा खाणीत काम करताना पूर्ण केले. छोटीशी नोकरी असूनही वडिलांनी उमेश यादवचे मोठे स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटर बनवले.

उमेशची कसोटी कारकीर्द चमकदार : 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या उमेश यादवची आत्तापर्यंतची कसोटी कारकीर्द चांगली राहिली आहे. उमेशने आत्तापर्यंत 54 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 165 बळी घेतले आहेत. उमेश यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाचा एक भाग आहे. मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये उमेशचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. आता वडिलांच्या निधनानंतर तो संघाबाहेर राहू शकतो.

तिसऱ्या कसोटीत शुभमनला संधी? : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसरा कसोटी सामन्यात सामन्यात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण उतरणार यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या केएल राहुलच्या सातत्यपूर्ण खराब परफाॅर्मन्समुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. तिसऱ्या कसोटीत त्याला संघाबाहेर बसवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्याच्या जागी संघात युवा सलामीवीर शुभमन गिलची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शुभमनने 2020 मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25 डावांत 736 धावा केल्या आहेत.

हेही वाचा : Harmanpreet Kaur Run Out : हरमनप्रीतच्या रन आउटने पलटला सामना, कर्णधाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.