नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवनला (Opener Shikhar Dhawan) कोरोनाची लागण झाल्याने सध्या आयसोलेशनमध्ये आहे. त्याने आपल्या आरोग्याबाबत गुरुवारी माहिती दिली आहे. त्याचबरोबर तो ठीक आहे आणि त्याच्या आरोग्यासाठी शुभकामना करणाऱ्या लोकांचे त्याने आभार मानले आहे.
श्रेयस अय्यर, शिखर धवन, रुतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी या चार खेळाडूंचा समावेश आहे, अहमदाबादला पोहोचल्यानंतर सात सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी फलंदाज मयंक अग्रवालचा भारताच्या एकदिवसीय संघात समावेश (Mayank Agarwal added India's ODI squad) केला.
शिखर धवनने ट्विट करताना म्हणाला, आपल्या शुभकामनासाठी तुम्हा सर्वांचे आभार. मी ठीक आहे आणि मला मिळालेल्या प्रेमाने मी विनम्र आहे. भारतीय संघातील सदस्यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी ३१ जानेवारीला अहमदाबादला जाण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अहमदाबादलाजाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना घरी आरटीपीसीआर टेस्ट करण्यास सांगितले होते.
बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) सांगितले की, भारतीय निवड समितीने सात खेळाडू पॉझिटीव्ह आल्यानंतर मयंक अग्रवालचा भारतीय संघात समावेश केला आहे. भारतीय संघाचे तीन प्रमुख खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल वनडे मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे. तसेच तो टी-20 मालिकेसाठी उपलब्ध असणार आहे.