नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषक २०२३ च्या तयारीसाठी बंगळुरू येथे आयोजित विशेष शिबिरात सहभागी झालाय. येथे सर्व खेळाडूंची फिटनेस लेव्हल चेक करण्यासाठी त्यांची यो-यो टेस्ट घेतली जात आहे. यासोबतच काही विशेष सत्रांचे आयोजन करून त्यांना विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला विनाकारण दुखापत होऊ नये. मात्र, दुखापतग्रस्त के एल राहुलची यो-यो टेस्ट अद्याप झालेली नाही.
-
Shubman Gill has the highest score on the Yo-Yo test. [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- 18.7 by Gill....!!!! pic.twitter.com/HpIzqLRWGx
">Shubman Gill has the highest score on the Yo-Yo test. [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023
- 18.7 by Gill....!!!! pic.twitter.com/HpIzqLRWGxShubman Gill has the highest score on the Yo-Yo test. [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023
- 18.7 by Gill....!!!! pic.twitter.com/HpIzqLRWGx
शुभमन गिलने अव्वल क्रमांक पटकावला : शिबिराच्या पहिल्या दोन दिवसात सर्व खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यात आली. अहवालानुसार, यो-यो टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांमध्ये युवा फलंदाज शुभमन गिलने सर्व दिग्गज खेळाडूंना मागे टाकत आघाडी मिळवलीय. शुभमन गिलने कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्यासारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले.
-
All the Indian players who have appeared in the Yo-Yo Test have passed - most of them scored between 16.5 to 18 [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- Gill has the highest with 18.7 pic.twitter.com/T1n2Vg26dw
">All the Indian players who have appeared in the Yo-Yo Test have passed - most of them scored between 16.5 to 18 [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023
- Gill has the highest with 18.7 pic.twitter.com/T1n2Vg26dwAll the Indian players who have appeared in the Yo-Yo Test have passed - most of them scored between 16.5 to 18 [PTI]
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023
- Gill has the highest with 18.7 pic.twitter.com/T1n2Vg26dw
उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता : शुभमन गिलचा यो-यो टेस्ट स्कोअर १८.७ एवढा आहे. हा सर्व भारतीय खेळाडूंमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. तर संघातील सर्वात फिट खेळाडू मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा स्कोअर १७.२ एवढा आहे. हा स्कोअर स्वतः कोहलीने सोशल मीडियावर शेअर केला होता. यो-यो टेस्टमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी १६.५ गुणांची आवश्यकता असते.
विराट कोहली आणि यो-यो टेस्ट वाद : दोन दिवसांपूर्वी यो-यो टेस्टवरून एक वाद निर्माण झाला होता. स्टार फलंदाज विराट कोहलीने आपला टेस्ट स्कोर सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र असे करणे बीसीसीआयच्या गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन आहे. या प्रकरणी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोहलीवर आक्षेप घेतलाय. यामुळे आता विराट कोहलीवर कारवाई देखील होऊ शकते.
यो-यो टेस्ट काय असते : भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला एक टेस्ट द्यावी लागते. या टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच त्या खेळाडूचा संघात समावेश केला जातो. बीसीसीआयने हा निकष लावलाय. यो-यो टेस्टमध्ये खेळाडूंच्या संपूर्ण शरीराची तपासणी केली जाते. खेळाडूंच्या फिटनेसचा दर्जा सुधारण्यासाठी ही टेस्ट अत्यंत उपयोगी मानली जाते.
हेही वाचा :