वॉर्सेस्टर - भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ४ गडी राखून पराभव केला. कर्णधार मिताली राजने या सामन्यात नाबाद ७५ धावा केल्या. तिने अखेरच्या षटकात चौकार मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि भारतीय संघावरिल क्लिन स्वीपची नामुष्की टाळली. अखेरच्या षटकादरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये कसे वातावरण होते. याचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला. यामुळे हा सामना ४७-४७ षटकांचा खेळवण्यात आला. इंग्लंड महिला क्रिकेट संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले. धावांचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने संघासाठी ४९ धावांची उपयुक्त खेळी केली. त्यानंतर कर्णधार मिताली राजने नाबाद अर्धशतक झळकावले.
भारतीय संघाला विजयासाठी ७ चेंडूत ६ धावांची आवश्यकता होती. तेव्हा मैदानात मिताली राजसोबत स्नेह राणा फलंदाजी करत होती. ४६व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सेट फलंदाज स्नेह राणा बाद झाली. तेव्हा मिताली राजची साथ देण्यासाठी झूलन गोस्वामी मैदानात उतरली. ६ चेंडूत ६ धावांची गरज असताना मिताली स्ट्राईकवर होती. पहिल्या चेंडूवर मितालीला एक धाव मिळाली आणि गोस्वामी स्ट्राईकवर गेली.
दुसऱ्या चेंडूवर झूलनने एक धाव घेत पुन्हा स्ट्राईक मितालीला दिली. ४ चेंडूत ४ धावांची गरज असताना, ड्रेसिंग रुममध्ये स्मृती मंधाना इंग्लंडची गोलंदाज कॅथरिन ब्रंट चेंडू कसा टाकणार याचा अंदाज बांधताना दिसली. एक तर ती चेडू स्टम्पवर ठेवेल नाहीतर चेंडू हार्ड लेंथवर टाकेल, असे स्मृती ड्रेसिंगरुममध्ये म्हणताना पाहायला मिळाली. पण मितालीने तोपर्यंत तिसऱ्या चेंडूवर चौकार खेचला आणि भारताला विजय मिळवून दिला. चौकार गेल्यानंतर स्मृतीसह ड्रेसिंगमधील उपस्थित सर्वांनी एकच जल्लोष केला.
-
A thrilling finish 👌
— BCCI (@BCCI) July 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A superb win 👍
A captain's knock 🙌#TeamIndia Head Coach @imrameshpowar takes us through what @M_Raj03 means to the side, how @JhulanG10 is an inspiration and more after the team's victory over England in the 3⃣rd #ENGvIND WODI. 👏 👏
Watch 🎥 👇 pic.twitter.com/967Rz6Kbio
">A thrilling finish 👌
— BCCI (@BCCI) July 4, 2021

Watch 🎥 👇 pic.twitter.com/967Rz6KbioA thrilling finish 👌
— BCCI (@BCCI) July 4, 2021
A superb win 👍
A captain's knock 🙌#TeamIndia Head Coach @imrameshpowar takes us through what @M_Raj03 means to the side, how @JhulanG10 is an inspiration and more after the team's victory over England in the 3⃣rd #ENGvIND WODI. 👏 👏
Watch 🎥 👇 pic.twitter.com/967Rz6Kbio
हेही वाचा - टी-२० मध्ये भारतीय क्रिकेटपटूचे तुफानी द्विशतक, १७ चेंडूत चोपल्या १०२ धावा
हेही वाचा - सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनल्यानंतर कसे वाटत आहे? मिताली राजचे ३ शब्दात उत्तर