जॉर्जटाउन: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 टी20 सामन्याची मालिका होत आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. यामुळे भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात येणार,असे अनेकांना वाटते होते.परंतु तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा सूर्या तळपल्याने 'टीम इंडिया'ने सात गडी राखत हा सामना जिंकला. सामना जिंकला तरी टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या मात्र त्याच्या युवा फलंदाज तिलक वर्माबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाला.
आव्हान कायम : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेत टीम इंडियाने सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. दोन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला. टीम इंडिया या मालिकेत 2-0ने पिछाडीवर होती,यामुळे भारतासाठी हा सामना 'करो या मरो'चा होता.परंतु सूर्यकुमार यादवने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात सूर्यकुमारला तिलक वर्माची साथ मिळाली. तिलक वर्माने नाबाद 49 धावांची खेळी केली. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे. पाच सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. तर वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला तरी ते मालिका आपल्या नावावर करतील. या मालिकेतील उर्वरीत दोन सामने शनिवारी आणि रविवारी होणार आहेत. हा सामना जिंकला तरी तिलक वर्माच्या हुकलेल्या अर्धशतकासाठी टीम इंडियाचा टी 20 कर्णधार हार्दिक पांड्याला जबाबदार करत क्रीडाप्रेमींनी हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.
23 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण : वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सूर्याने फक्त 23 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान भारतीय संघाची फलंदाजी सुरुवातील खराब झाली. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादव मैदानात उतरला आणि त्याने अख्या सामन्याची दिशा बदलली.सूर्यकुमारने फटकेबाजी करत अवघ्या 44 चेंडूत 217.39च्या स्ट्राईक रेटने 83 धावा ठोकल्या. तर 23 चेंडूमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आपल्या टी20च्या करिअरमध्ये सूर्यकुमारने 14 वे अर्धशतक या सामन्यात पूर्ण केले.
'टीम इंडिया'चा कर्णधार हार्दिक पांड्या झाला ट्रोल :- सूर्यकुमार यादवची आक्रमक खेळी संपुष्टात आल्यानंतर डावखुऱ्या तिलक वर्माने आक्रमण आणि बचावाचा मिलाफ साधत कर्णधार हार्दिक पांड्याच्या साथीने डाव सावरला. टीमला विजयासमीप नेण्यात त्याने मोठे योगदान दिले. संघाला सामना जिंकण्यासाठी दोन धावांची गरज असताना तिलक वर्मा 49 धावांवर नाबाद होता. त्याला सलग दुसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतक करण्याची संधी होती. संघाच्या हातात काही चेंडूही होते. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या आपल्या युवा साथीदाराला अर्धशतक करण्याची संधी देईल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण एक धाव काढून तिलकला संधी देण्याऐवजी हार्दिकने षटकार ठोकत सामना संपवला. विशेष म्हणजे हाच हार्दिक जिंकण्यासाठी 10 धावा बाकी तिलकला शेवटपर्यंत टिकून सामना तुलाच फिनिश करायचा आहे, असे सांगताना स्टम्प माइकमार्फत चाहत्यांनी ऐकले होते. फटकेबाज फलंदाज संजू सॅमसनच्या जागी स्वतः फलंदाजीसाठी उतरल्याबद्दलही हार्दिकला क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर ट्रोल केले. चाहत्यांच्य मते, सोप्या सामन्यात फलंदाजीसाठी स्वतः उतरत हार्दिकने स्वतःला 'सेफ' ठेवले.
5 गडी गमावत केल्या 159 धावा : वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने भारतासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले.वेस्ट इंडिजने 159 धावा करताना आपले 5 गडी गमावले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने फक्त 3 गडी गमावले. भारताने 17.5 षटकात वेस्ट इंडिजचे आव्हान पार केले. वेस्ट इंडिजकून ब्रेंडन किंगने 42 आणि रोव्हमन पॉवेलने 40 धावा केल्या.गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा गोलंदाज अल्झारी जोसेफने 2 बळी घेतले. तर भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने तीन बळी घेतले.
हेही वाचा-