ETV Bharat / sports

India vs West Indies 3rd ODI : भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला 'व्हाईट वॉश'

India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने वेस्ट इंडीजला तिसऱ्या सामन्यातही मात देत मालिका 3-0 ने जिंकली आहे. 39 वर्षांत पहिल्यांदाच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला आहे.

India vs West Indies 3rd ODI
India vs West Indies 3rd ODI
author img

By

Published : Jul 28, 2022, 7:02 AM IST

Updated : Jul 28, 2022, 7:56 AM IST

IND vs WI 3rd ODI Result: भारत आणि वेस्ट इंडीज टीममध्ये सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 3-0 अशी जिंकली आहे. या मालिकेत तिसरा आणि शेवटचा सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियममध्ये झाला आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा डकवर्थ- लुईस यांने ११९ धावांनी पराभव केला आहे. तिसरा सामना जिंकून भारतीय यजमानांना ‘व्हाईट वॉश’ दिला आहे. ( india vs west indies ) वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश देण्याची कामगिरी करणारा शिखर धवन हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला गेला आहे. पावसात सतत येत असलेल्या अडथळ्यामुळे भारताने 36 षटकांत 3 गडी गमावून 225 धावा केले होते.

डकवर्थ- लुई नियमानुसार यजमानांना 35 षटकांमध्ये 257 धावांचे लक्ष्य केले आहे. मात्र, 26 षटकांमध्ये विंडीजचा सर्व संघ थंडगार झाला. त्यांना 137 धावांपर्यंतच त्यांना मजल मारता आली आहे. विजयासाठी मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजची सुरुवात वाईट झाली. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात विंडीजला सलग 2 मोठे धक्के दिले आहे. ( india vs west indies ) त्यानंतर ब्रँडन किंग (४२) आणि निकोलस पूरन (४२) वगळता कोणत्याही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीवर टीकू दिले नाहीत. इंडियाच्या वतीने युझवेंद्र चहलने 4, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येक 1 बळी घेतला आहे.

या अगोदर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार शिखर धवन आणि शुबमन गिल या दोघांने पहिल्या गड्यासाठी शतक करत भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. दोन्ही खेळाडूंनी मिळून ११३ धावा केले आहेत. 58 या वैयक्तिक धावसंख्येवर वॉल्शने धवनला बाद केले आहे. भारताला हा पहिला धक्का दिला. यानंतर पाऊस पडल्याने जवळपास 2 तासांचा खेळ थांबवला गेला होता. पाऊस थांबल्यानंतर भारताने श्रेयस अय्यर (४४) आणि सूर्यकुमार यादव (८) यांच्या रूपात आणखी 2 गडी गमावले. यानंतर परत पाऊस सुरू झाला होता. पावसामुळे भारताचा डाव 36 षटकांमध्ये संपवण्यात आला आहे.

भारताने 36 षटकामध्ये 3 गडी गमावून 225 धावा केले आहे. भारताचा शुबमन गिल 98 धावांवर नाबाद राहिला गेला. त्याने 98 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 98 धावा केले आहे. पावसामुळे त्याचे शतक थोडक्यात हुकले आहे. नाहीतर तो परदेशामध्ये एकदिवसीय सामन्यात शतक करणारा सर्वात तरूण भारतीय खेळाडू ठरला असता. मालिकेत 2 अर्धशतकी खेळी करणाऱ्या शुबमनला मालिकावीराचा आणि सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात आले आहे. भारताला २९ जुलैपासुन वेस्ट इंडीजविरुद्ध 5 सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Cabinet : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा; युवकांवर दाखल झालेले 'ते' गुन्हे मागे घेणार

हेही वाचा - Uddhav Thackeray Birthday : प्रतिज्ञापत्र, शिवसैनिकांची भेट, आपुलकीचा संवाद; वाढदिवस मात्र निमित्त...?

Last Updated : Jul 28, 2022, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.