ETV Bharat / sports

भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिका उद्यापासून; दासून शनाका म्हणाला...भारताची गोलंदाजी आक्रमक - भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 मालिका

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेलाही एक झटका बसला असून श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे.

Sri Lanka T-20 Captain Dasun Shanaka
श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका
author img

By

Published : Feb 23, 2022, 7:59 PM IST

लखनौ : ऑस्ट्रेलियातील फलंदाजांच्या कामगिरीवर श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका (Sri Lanka T-20 Captain Dasun Shanaka) निराश आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत (India VS Sri Lanka T-20) आमच्या टॉप ऑर्डरने अधिक सातत्य दाखवायचे आहे, असे तो म्हणाला. ऑस्ट्रेलियात श्रीलंकेचा 1-4 असा पराभव झाला आहे. यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी श्रीलंकेलाही परिस्थिती आणि संयोजन जाणून घेण्याची संधी मिळाली. श्रीलंकेच्या टॉप ऑर्डरला मात्र ऑस्ट्रेलियात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही, असेही शनाका म्हणाला.

दासून शनाका म्हणाला...भारताची गोलंदाजी आक्रमक

भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्याच्या पूर्वसंध्येला शनाकाने बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी शनाका म्हणाला की, “आम्हाला शीर्ष क्रमाने चांगली कामगिरी करायची आहे. जेव्हा जेव्हा टॉप ऑर्डर धावा करतो तेव्हा आमची जिंकण्याची शक्यता चांगली असते. पुढे तो म्हणाला, "भारताची गोलंदाजी आक्रमण व मजबूत आहे आणि आम्हाला आमच्या शीर्ष क्रमाने चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे जेणेकरून आमच्या गोलंदाजांना धावांचा बचाव करण्याची संधी मिळेल.

भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्यापासून टी20 सामना -

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात उद्यापासून (24 फेब्रुवारी) टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वीच भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यानंतर आता श्रीलंकेलाही एक झटका बसला असून श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू ऑलराउंडर वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) कोरोनाबाधित झाल्यामुळे मालिकेला मुकणार आहे. त्याला कोरोनाची बाधा झाली असून अजून तो पूर्णपणे ठिक झाला नसल्याने तो तिन्ही टी20 सामन्यांना मुकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.