कोलंबो Ind Vs SL : आशिया चषकाच्या सुपर ४ टप्प्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी झाला. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतानं ४९.१ षटकांत सर्वबाद २१३ धावा केल्या. प्रत्युतरात श्रीलंका ४१.३ षटकांत १७२ धावाचं करू शकला. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवनं ४३ धावा देत ४ विकेट घेतल्या. तर बुमराह आणि जडेजानं २-२ बळी घेतले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालेजनं ४६ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४२ धावा केल्या.
भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने आशिया कप २०२३च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकात २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ४१.३ षटकांत १७२ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावा केल्या. राहुलने ३९ आणि किशनने ३३ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच आणि चरिथ असलंकाने चार विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या डावात ड्युनिथ वेलालगेने सर्वाधिक ४२ धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने ४१ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताच्या सर्वबाद २१३ धावा : कर्णधार रोहित शर्मा ४८ चेंडूत ५३ धावा, तर केएल राहुलनं ४४ चेंडूत ३९ धावांचं योगदान दिलं. विराट कोहली १२ चेंडूत केवळ ३ धावा करून बाद झाला. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालेजनं १० षटकात ४० धावा देत ५ गडी बाद केले. तर चारिथ असालंकानं ९ षटकात १८ धावा देत ४ विकेट घेतल्या.
डी सिल्वाची ४१ धावांची खेळी : भारतानं दिलेल्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहनं पाथुम निसांकाला ६ धावांवर राहुलच्या हाती झेलबाद केलं. त्यानंतर त्यानं मेंडिसला १५ धावांवर बाद केलं. सिराजनं करुणारत्नेला २ धावांवर तंबूत पाठवलं. धनंजया डी सिल्वानं एका बाजूनं किल्ला लढवला. त्यानं ६६ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीनं ४१ धावांची खेळी केली. त्याला रविंद्र जडेजानं शुभमन गिलच्या हाती झेलबाद केलं.
गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी : सुपर ४ मध्ये भारत आणि श्रीलंकेनं प्रत्येकी एक सामना जिंकला असून, गुणतालिकेत भारत अव्वल तर श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसानं व्यत्यय आणल्यानंतर काल राखीव दिवशी सामना पूर्ण झाला. या सामन्यात भारतापाकिस्तानवर तब्बल २२८ धावांनी धडाकेबाज विजय मिळवला.
हेही वाचा :