ETV Bharat / sports

Ind vs SA, 3rd ODI : दक्षिण आफ्रिकेने भारताला केलं ‘क्लीन स्वीप’, थोडक्यात सामना गमावला - दक्षिण आफ्रिकेने भारताला केलं क्लीन स्वीप

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवशीय सामना आज पार ( Ind vs SA 3rd ODI ) पडला. अखेरच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे ( India Looses by South Africa ) लागले. पहिले दोन सामन्यातच भारताने मालिका गमावली होती. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने मालिका जिंकली आहे.

Ind vs SA, 3rd ODI
Ind vs SA, 3rd ODI
author img

By

Published : Jan 23, 2022, 11:55 PM IST

Updated : Jan 24, 2022, 1:12 AM IST

केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा एकदिवशीय सामना आज पार ( Ind vs SA 3rd ODI ) पडला. अखेरच्या ओव्हरपर्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे ( India Looses by South Africa ) लागले. पहिल्या दोन सामन्यातच भारताने मालिका गमावली होती. मात्र, आता दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने मालिका ( Africa Win 3-0 ODI ) जिंकली आहे.

नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना सुरु झाल्यानंतर भारताने उत्तम गोलंदाजीचा नमूना दाखवत मलान, बावुमा आणि मार्करम या खेळाडूंना तंबुत माघारी पाठवले. मात्र, डी कॉक आणि ड्युसेन यांनी डाव सावरत 288 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. डी कॉकने 124 करत शतक तर, ड्युसेनने अर्धशतकी खेळी करत 52 धावा केल्या. मिलरनेही 39 धावांची पारी खेळली. भारतीय गोलंदजातील प्रसिध कृष्णाने सर्वाधिक 3, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तसेच, युझवेंद्र चहलने एक विकेट घेतली.

तीघांचे अर्धशतक व्यर्थ

288 धावांचे लक्ष गाठण्यासाठी शिखर धवन (61), विराट कोहली (65), दीपक चाहर (54) यांनी अर्धशतक ठोकली. सूर्यकुमारने 39 धावा केल्या. दीपक चाहरने हा 10 धावांची गरज असताना झेलबाद झाला. त्यानंतर बुमराह, चहल आणि प्रसिद्ध यांना 10 धावा करता न आल्याने भारतीय संघ 282 धावांवर गुंडाळला गेला. त्यामुळे भारताला चार धावांनी पराभवला सामोरे जावे लागले.

हेही वाचा - IPL 2022 Mega Auction: शिखर धवन 2 कोटी, श्रीशांत 50 लाख तर लिलावात कोणत्या खेळाडूची आधारभूत किंमत किती? घ्या जाणूनहेही वाचा -

Last Updated : Jan 24, 2022, 1:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.