जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २६६ धावा केल्या. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेकडे २७ धावांची आघाडी असल्यामुळे त्यांच्यासमोर दुसऱ्या डावात विजयासाठी २४० धावांचे आव्हान असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे.
लाईव्ह अपडेट -
- तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी आफ्रिकेच्या 2 बाद 118 धावा झाल्या होत्या. त्यांना विजयासाठी अजून 122 धावांची आवश्यकता असून आठ विकेट्स शिल्लक आहेत.
- कर्णधार डीन एल्गर 46 धावांवर नाबाद असून एडन मारक्रमस 31 तर किगन पिटरसेन 28 धावा काढून बाद झाले. भारताकडून शार्दुल ठाकूर व आर.आश्विन यांनी 1-1 बळी घेतले
- चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या बिनबाद 38 धावा
- दक्षिण आफ्रिकेची डीन एल्गर व एडन मारक्रमस ही सलामीजोडी मैदानात
- भारताच्या दुसऱ्या डावात सर्वबाद 266 धावा. आफ्रिकेसमोर 240 धावांचे आव्हान
- हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद.
- मोहम्मद शमी व शार्दल ठाकूर भोपळाही न फोडता बाद
- शार्दुल ठाकुरची फटकेबाजी २४ चेंडूत पाच चौकार व एका षटकारच्या मदतीने २८ धावांची खेळी
- आर अश्विन 16 धावा काढून लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर बाद
- भारताला पाचवा धक्का, रिषभ पंत शुन्यावर बाद, त्याला ही रबाडाने बाद केले
- अजिंक्य रहाणे पाठोपाठ अर्धशतक झळकावून पुजाराही 53 धावांवर बाद, रबाडाने केले पायचीत
- - अजिंक्य रहाणे 58 धावांवर बाद, रबाडाने घेतला बळी
रिषभ पंत शुन्यावर बाद झाल्यानंतर आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर अश्विन 16 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकुरने झटपट खेळी करत २४ चेंडूत २८ धावा केल्या. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार ठोकला. त्याला मार्को जॅनसेनने बाद केले. नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद शमी खातेही खोलू शकला नाही. मार्कोच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. जसप्रीत बुमराह १४ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. बुमराहने एक षटकारही ठोकला. दहाव्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेला मोहम्मद सिराजही खाते खोलू शकला नाही. तर हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २०२ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिका संघाने सर्वबाद २२९ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा २ गडी गमवून ८५ धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळी करत भारताची धावसंख्या दीडशेच्या पार पोहचवली. चेतेश्वर पुजाराने कसोटी कारकिर्दीतील ३२ वे अर्धशतक झळकावत 53 धावा केल्या. अजिंक्य रहाणेनेही 58 धावांचे योगदान दिले. रहाणे-पुजारा ही जमलेली जोडी कागिसो रबाडाने फोडली. रबाडाने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा दोघांचाही बळी घेतला. गोलंदाजीवर बाद झाले.