ETV Bharat / sports

Kohli-Bairstow Argument : 'तोंड बंद ठेवून फलंदाजी कर..', जॉनी बेअरस्टोला भिडला विराट, पंचांना करावा लागला हस्तक्षेप - Johnny Bairstow and Virat Kohli argument

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा आक्रमक अंदाजात दिसला. इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली जॉनी बेअरस्टोसोबत ( Kohli-Bairstow Argument ) भिडला.

Kohli-Bairstow Argument
Kohli-Bairstow Argument
author img

By

Published : Jul 3, 2022, 5:51 PM IST

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड ( Ind vs Eng 5th Test ) यांच्यातील एजबॅस्टन कसोटीत संपूर्ण थरार पाहायला मिळत आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने या सामन्यात आघाडी घेतली असून तिसऱ्या दिवसाची सुरुवात जोरदार वादाने झाली. इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद ( Virat kohli fight with jonny bairstow ) झाला. यानंतर पंचांना हस्तक्षेप करावा लागला.

वास्तविक, तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स क्रीजवर आले. खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात काही संवाद झाला.

जॉनी बेअरस्टोचा एका बॉलवर फसला, त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टोने प्रत्युत्तर देताच विराट कोहली त्याच्या दिशेने सरसावला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, काही संवाद माईकमध्ये ही रिकॉर्ड झाला. ज्यामध्ये विराट कोहली म्हणत होता, मी काय करायचे ते सांगू नकोस, तोंड बंद करून बॅटींग कर, असे म्हणताना ऐकू येत आहे.

विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात जोरदार वादावादी ( Johnny Bairstow and Virat Kohli argument ) झाली आणि पंचांनाही हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही पंचांनी कोहली आणि बेअरस्टो यांना शांतता राखण्यास सांगितले. त्यानंतर वातावरण थोडे शांत झाले, मोहम्मद शमीचे ओव्हर संपले तेव्हा ब्रेकच्या दरम्यान विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात चर्चा झाली. दोघेही हसताना दिसले.

आदल्या दिवशी पाऊस पडला तेव्हा विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोघेही मस्करी करत पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते. विराट कोहलीबद्दल बोलायचे तर अशी आक्रमक शैली मैदानावर अनेकदा पाहायला मिळते, जी चाहत्यांना खूप आवडते.

एजबॅस्टन कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, भारताने प्रथम फलंदाजी करताना 416 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या. नंतर टीम इंडियाने गोलंदाजीतही चमत्कारिक कामगिरी केली आणि 83 धावांवर इंग्लंडच्या पाच विकेट्स घेतल्या. या मालिकेत भारत आधीच 2-1 ने आघाडीवर आहे, जर टीम इंडियाने हा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका भारताच्या नावावर होईल. इंग्लंड संघाने आपल्या पहिल्या डावात 45.3 षटकांत 6 बाद 200 धावा केल्या आहेत. सध्या जॉनी बेअरस्टो 91 आणि सॅम बिलिंग्स 7 धावांवर खेळत आहेत.

हेही वाचा - Ind Vs Eng 5th Test : भारताच्या 416 धावांना प्रत्युत्तर देताना, दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने केल्या 5 बाद 84 धावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.