ETV Bharat / sports

भारत-अफगाणिस्तान सामना सुपर ओव्हरमध्येही टाय

India Vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर टी 20 सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 212 धावा केल्या. यानंतर अफगाण संघानंही 20 षटकात 6 गडी गमावत 212 धावा केल्या. त्यामुळे सामना टाय झाला.

रोहित शर्मा
रोहित शर्मा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 9:09 PM IST

Updated : Jan 17, 2024, 11:03 PM IST

बंगळुरू India Vs Afghanistan : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील शेवटचा सामना आज बेंगळुरूमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 212 धावा केल्या. आता अफगाणिस्तानसमोर 213 धावांचं लक्ष्य आहे.

विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद : या सामन्यात एकेकाळी भारतीय संघाची अवस्था 22 धावांवर 4 विकेट अशी झाली होती. यशस्वी 4 धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबे (1) आणि संजू सॅमसन (0) देखील झटपट बाद झाले आहेत. मात्र यानंतर रोहित शर्मानं रिंकू सिंहच्या मदतीनं टीम इंडियाची धुरा सांभाळत 5व्या विकेटसाठी 95 चेंडूत 190 धावांची भागीदारी केली.

रोहित शर्माचं पाचवं शतक : रोहित शर्मानं 64 चेंडूत शतक झळकावत इतिहास रचला. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यानंतर रिंकू सिंहनं आंतरराष्ट्रीय टी 20 मधील दुसरं अर्धशतक झळकावलं. त्यानं 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात रोहितनं 69 चेंडूत नाबाद 121 धावा केल्या. या दरम्यान त्यानं 8 षटकार आणि 11 चौकार मारले. दुसरीकडे, रिंकूनं 39 चेंडूत 69 धावांची नाबाद खेळी केली. त्यानं 6 षटकार आणि 2 चौकार मारले. रोहितनं या मालिकेत प्रथमच आपलं खातं उघडलं. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला होता.

मालिका आधीच खिशात घातली : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आजचा तिसरा सामना जिंकला तर भारतीय संघ अफगाणिस्तानला मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप करेल. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघानं मालिका आधीच खिशात घातली आहे. भारतीय संघाला या वर्षी जूनमध्ये टी 20 विश्वचषक खेळायचा आहे. याआधी भारताची ही शेवटची टी 20 मालिका आहे. या दृष्टीनंही हा शेवटचा सामना आहे.

प्लेइंग 11 मध्ये बदल : रोहितनं प्लेइंग 11 मध्ये तीन बदल केले. अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि जितेश शर्मा यांना विश्रांती देण्यात आली, तर संजू सॅमसन, आवेश खान आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश करण्यात आला. अफगाणिस्तान संघातही 4 बदल करण्यात आले. फजलहक फारुकी, नूर अहमद, नवीन उल हक आणि मुजीब उर रहमान यांना वगळण्यात आलं. त्यांच्या जागी शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी आणि फरीद अहमद मलिक यांना संधी देण्यात आली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, कुलदीप यादव.

अफगाणिस्तान - रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरन (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, शरफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.

हे वाचलंत का :

  1. यशस्वी, अक्षरची टी 20 क्रमवारीत मोठी झेप, हा भारतीय फलंदाज अजूनही अव्वल स्थानी
  2. प्रज्ञानानंदनं विश्वविजेत्या डिंग लिरेनला हरवलं, विश्वनाथन आनंदला मागे टाकून बनला नंबर 1 खेळाडू

Last Updated : Jan 17, 2024, 11:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.