अॅडलेड - १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे तगडी फलंदाजी आहे, असे संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी म्हटले आहे. शिवाय, अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन या सामन्यात पदार्पण करू शकतो, असा विश्वासही लँगर यांना आहे.
सिडनी क्रिकेट मैदानावर (एसीसीजी) भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया-अ संघात दुसरा सराव सामना खेळताना ग्रीनला डोक्याला दुखापत झाली. लँगर यांनी असेही म्हटले आहे की, बर्याच खेळाडूंना दुखापत झाली असली तरी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगली आहे. निवडकर्त्यांनी ग्रीनचा पर्याय म्हणून मोइसेस हेन्रिक्सचा संघात समावेश केला आहे. ग्रीन सोमवारी अॅडलेडमध्ये दाखल झाला आणि संघात सामील झाला.
हेही वाचा - गावसकर म्हणतात, ''कर्णधार म्हणून अजिंक्यवर कोणताही दबाव नसेल''
लँगर म्हणाले, "गुरुवारपर्यंत पाहा आणि थांबा. आमच्याकडे एक चांगली टीम आहे. वॉर्नरच्या अनुपस्थितीमुळे आमचे नुकसान होत आहे यात काही शंका नाही, परंतु मला खरोखरच आमची फलंदाजी पाहण्यास आवडते. त्यांच्याबद्दल मला खूप आत्मविश्वास आहे."
असे आहे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ –सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा