सिडनी - ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३९० धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ ३३८ धावांपर्यंत मजल मारू शकला. सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी विजय मिळवत एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने ८९ धावांची शानदार खेळी केली. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जलद २२ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
-
22000 international runs for King Kohli 👏👏#TeamIndia pic.twitter.com/ulWqBZ3tuM
— BCCI (@BCCI) November 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">22000 international runs for King Kohli 👏👏#TeamIndia pic.twitter.com/ulWqBZ3tuM
— BCCI (@BCCI) November 29, 202022000 international runs for King Kohli 👏👏#TeamIndia pic.twitter.com/ulWqBZ3tuM
— BCCI (@BCCI) November 29, 2020
विराट कोहलीच्या नावावर आता तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये मिळून २२,०११ धावांची नोंद आहे. एकूण ४६२ सामन्यांमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. सध्या कसोटीत ७२४०, एकदिवसीयमध्ये ११९७७ आणि टी २० मध्ये २७९४ धावा त्याच्या नावावर आहेत. कोहलीने २१ हजार धावांचा टप्पाही सर्वात जलद गतीने पार केला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याने २१ हजार धावा नावावर केल्या होत्या. याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विटरवर कोहलीचे अभिनंदन करणारे ट्विट शेअर केले आहे.