सिडनी - सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला दुखापत झाली आहे. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे. जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये १५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्यातून त्याने माघार घेतली आहे.
डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत -
तिसऱ्या कसोटीदरम्यान शॉर्ट चेंडू खेळताना जडेजाला ही दुखापत झाली. त्यानंतर त्याच्या अंगठ्याचे स्कॅनिंग करण्यात आले. रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर आहे. ग्लोव्हज घालून फलंदाजी करणे त्याला शक्य नाही, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आहे. अंगठ्याला झालेल्या या दुखापतीमुळे पुढचे दोन ते तीन आठवडे तो खेळू शकणार नसल्याने अंतिम कसोटी सामन्यातून त्याने माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जडेडा प्रचंड फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याचे संघाबाहेर जाणे भारतासाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची १५ हजार कोटींची थकबाकी; वसुलीची मागणी