मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 'बॉर्डर-गावसकर' मालिकेचा दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. 'बॉक्सिंग डे' म्हणून ओळखला जाणारा हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्याच्या सामनावीर पुरस्काराबात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) एक घोषणा केली आहे.
हेही वाचा - पाँटिंग म्हणतो, ''कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश मिळू शकतो''
या कसोटी सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणार्या खेळाडूला एक विशेष पदक देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी आदिवासी खेळाडू जॉनी मुलघ यांच्या नावाचे हे पदक असून देशातील आदिवासी लोकांशी संबंध सुधारण्याचे आणि त्यांच्या खेळाडूंचा सन्मान करण्याचे मंडळाचे उद्दीष्ट आहे.
कोण होते जॉन मुलघ?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) रविवारी ही माहिती दिली. १८६८ मध्ये इंग्लंडच्या दौर्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी संघाचे मुलघ यांनी नेतृत्व केले होते. बॉक्सिंग डे कसोटीत सामनावीर पुरस्कारासाठी मुलघ पदक देण्यात येईल. १८६८च्या संघाने परिधान केलेल्या बेल्ट बकलमधून हे पदक तयार करण्यात आले आहे, असे मंडळाने सांगितले.
३६ धावांवर गारद -
बॉर्डर-गावसकर मालिकेतील गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना सर्वांच्याच लक्षात राहिला. क्रिकेटमध्ये बलाढ्य अशा भारतीय संघाला हेझलवूड-कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नेस्तनाबूत केले. भारताचा संघ दुसऱ्या डावात नामुष्कीजनक ३६ धावाच करू शकला. कसोटी कारकिर्दीतील भारतीय संघाची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली.