ब्रिस्बेन - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी बरोबरीत सुटली. शेवटच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी सर्व षटके खेळून काढत ऑस्ट्रेलियाकडून विजयाचा घास हिरावला. मधल्या फळीत रवीचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी यांनी चिवट भागीदारी उभारली. या खेळीदरम्यान अश्विनने मला मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन केल्याचे विहारीने सांगितले.
हेही वाचा - IND VS AUS : विल पुकोवस्कीला दुखापत; प्रशिक्षक लँगरने दिले 'हे' संकेत
विहारी म्हणाला, "मी खूप आनंदी आहे. जेव्हा मला असे वाटत होते, की मी थोडासा निराश होत आहे, तेव्हा अश्विन मोठ्या भावासारखा माझ्याशी बोलत होता. एकावेळी फक्त एका चेंडूवर लक्ष केंद्रित कर, शक्य तितका वेळ घे, असे तो मला सांगत होता. ते खूप विशेष होते. "
या डावात पाठीला दुखापत होऊनही अश्विनने १२८ चेंडूंचा सामना करत ३९ धावा केल्या. शेवटपर्यंत पुजारा असता, तर हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो, असेही विहारीने सांगितले.
विहारी म्हणाले की, शेवटपर्यंत चेतेश्वर पुजारा असतो तर भारत हा सामना जिंकू शकला असता. ते म्हणाले, "हा सामना बरोबरीत सोडवणे आमच्यासाठी चांगला निर्णय होता. पुजारा शेवटपर्यंत असता तर निकाल आमच्या बाजूने लागला असता. पण तरीही १० गुण मिळविणे महत्त्वाचे ठरले."