ETV Bharat / sports

बॉक्सिंग डे कसोटी जिंकल्यानंतर विराटकडून अजिंक्यचे कौतुक, म्हणाला...

अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Couldn't be happier for Jinks: Kohli hails captain Rahane after MCG win
''अजिंक्यसाठी मी प्रचंड आनंदी,'' बॉक्सिंग डे कसोटी जिंकल्यानंतर विराटची प्रतिक्रिया
author img

By

Published : Dec 29, 2020, 10:57 AM IST

Updated : Dec 29, 2020, 1:11 PM IST

मेलबर्न - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्या कसोटीत झालेल्या लाजिरवाण्याचा पराभवाचा बदला भारताने मेलबर्नवर घेतला. या कसोटीत अजिंक्यने नेतृत्वासोबत कर्तृत्वही सिद्ध केले. पहिला कसोटी सामना खेळून मायदेशी परतलेल्या विराट कोहलीने अजिंक्य आणि टीम इंडियाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा - YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

विराट म्हणाला, ''हा एक रोमांचक विजय आहे. संपूर्ण संघाने खूप मेहनत घेतली. विजयाकडे वाटचाल केलेल्या संघासाठी आणि विशेषत: अजिंक्यसाठी मी खूप आनंदी आहे.'' अंजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या दिवशी ७० धावांचे आव्हान मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताने सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराला गमावले. पण, शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेने विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावांची खेळी केली. यामुळे अजिंक्य सामनावीर ठरला. ७० धावांचे आव्हान ओलांडताना अजिंक्यने विजयी फटका खेळला. तब्बल ७ वर्षांनी भारतीय कर्णधाराने कसोटी क्रिकेटमध्ये विजयी फटका खेळण्याचा योगायोग जुळून आला आहे. २०१३ साली कर्णधार धोनीने दिल्ली कसोटीत विजयी फटका खेळला होता.

पहिल्या कसोटीत ३६ धावांचा विक्रम -

अ‌ॅडलेड ओव्हल येथे झालेल्या 'पिंक बॉल' कसोटीच्या दुसर्‍या डावात भारताला फक्त ३६ धावा करता आल्या. ही धावसंख्या भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.

Last Updated : Dec 29, 2020, 1:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.