ETV Bharat / sports

Women U19 WC : भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय, पहिल्याच टी२० विश्वचषकावर कोरले नाव - भारताने महिला अंडर १९ टी२० विश्वचषक जिंकला

ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक भारत विरुद्ध इंग्लंड सामना पॉचेफस्ट्रूम येथील जेबी मार्क्स ओव्हल मैदानावर खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करताना भारताने इंग्लंडला 68 धावांत गुंडाळले. भारताने 14 षटकात अवघ्या 1 चेंडूत सामना जिंकला. भारतीय महिला संघाने इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्याच टी२० विश्वचषकावर भारतीय महिला संघाने नाव कोरले आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला टीमचे अभिनंदन केले आहे.

India lift inaugural Women's U-19 T20 World Cup with seven wicket win over England
भारताने इंग्लंडचा पराभव करून T20 विश्वचषक जिंकला..
author img

By

Published : Jan 29, 2023, 8:05 PM IST

Updated : Jan 29, 2023, 10:33 PM IST

पॉचेफस्ट्रूम : ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरताना इंग्लंडचा संघ ६८ धावांत आटोपला.

भारतीय संघाची कामगिरी - भारताकडून तीतस साधू, पार्श्वी चोप्रा आणि अर्चना देवी यांनी 2-2 बळी घेतले. तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने 1 चेंडूत 14 षटकात 3 विकेट्स गमावून विजय मिळवला. भारताकडून सौम्या तिवारी आणि त्रिशा यांनी 24-24 धावा केल्या. शेफालीने 15 तर श्वेताने 5 धावा केल्या.

  • Congratulations to the Indian Team for a special win at the @ICC #U19T20WorldCup. They have played excellent cricket and their success will inspire several upcoming cricketers. Best wishes to the team for their future endeavours. https://t.co/BBn5M9abHp

    — Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विश्वचषकावर भारताने कोरले नाव - कर्णधार शफाली वर्मा हिच्या नेतृत्वातील भारतीय संघ पहिला १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषकाचा किताब पटकाण्याच्या तयारीने मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो गोलंदाजांनी सार्थ ठरवत इंग्लंडला ६८ धावांवर सर्वबाद केले. तीतस साधूला सामनाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हन्सला मालिकावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • Women’s Cricket in India is on the upswing and the World Cup triumph has taken the stature of women’s cricket several notches higher. I am delighted to announce INR 5 crore for the entire team and support staff as prize money. This is surely a path-breaking year.

    — Jay Shah (@JayShah) January 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

५ कोटी रुपयांचे बक्षीस - बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणतात की, भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे.

Last Updated : Jan 29, 2023, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.