अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज (India and West Indies) संघात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI series between IND and WI) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले असून मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील तिसरा सामना आज (शुक्रवारी) अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे.
-
Hello & welcome from the Narendra Modi Stadium, Ahmedabad for the third & final @Paytm #INDvWI ODI. 👋#TeamIndia pic.twitter.com/Pj8TANULMr
— BCCI (@BCCI) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hello & welcome from the Narendra Modi Stadium, Ahmedabad for the third & final @Paytm #INDvWI ODI. 👋#TeamIndia pic.twitter.com/Pj8TANULMr
— BCCI (@BCCI) February 11, 2022Hello & welcome from the Narendra Modi Stadium, Ahmedabad for the third & final @Paytm #INDvWI ODI. 👋#TeamIndia pic.twitter.com/Pj8TANULMr
— BCCI (@BCCI) February 11, 2022
भारताकडे क्लीन स्वीप देण्याची संधी :
-
💬 💬 "I've shifted my focus from competition to contribution."
— BCCI (@BCCI) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ahead of the third @Paytm #INDvWI ODI, #TeamIndia's @SDhawan25 - during his pre-match interview - shares his approach towards the game. pic.twitter.com/xlj7Vc1K6q
">💬 💬 "I've shifted my focus from competition to contribution."
— BCCI (@BCCI) February 11, 2022
Ahead of the third @Paytm #INDvWI ODI, #TeamIndia's @SDhawan25 - during his pre-match interview - shares his approach towards the game. pic.twitter.com/xlj7Vc1K6q💬 💬 "I've shifted my focus from competition to contribution."
— BCCI (@BCCI) February 11, 2022
Ahead of the third @Paytm #INDvWI ODI, #TeamIndia's @SDhawan25 - during his pre-match interview - shares his approach towards the game. pic.twitter.com/xlj7Vc1K6q
तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या वनडे सामन्यात शिखर धवनचा (Batsman Shikhar Dhawan) भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. या अगोदच्या सामन्यांना शिखर धवन मुकला होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता या मधून तो रिकव्हर झाला आहे. तसेच भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाला मायदेशात क्लीन स्वीप देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे.
-
Huddle Talk ✅
— BCCI (@BCCI) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We are moving closer to the LIVE action from Ahmedabad. 👍 👍#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/YnQJuVuf2O
">Huddle Talk ✅
— BCCI (@BCCI) February 11, 2022
We are moving closer to the LIVE action from Ahmedabad. 👍 👍#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/YnQJuVuf2OHuddle Talk ✅
— BCCI (@BCCI) February 11, 2022
We are moving closer to the LIVE action from Ahmedabad. 👍 👍#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/YnQJuVuf2O
रोहित शर्माला सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडीत काढण्याची संधी :
या सामन्यात रोहित शर्माला सचिन तेंडूलकरचा एक विक्रम मोडीत काढत (Rohit will break Sachin Tendulkar record), त्याला मागे टाकण्याची संधी असणार आहे. सध्या रोहित शर्मा हा वनडेत वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक (Most ODI runs against West Indies) धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडूलकर 1024 धावांसह पहिल्या, सौरव गांगुली 1015 धावांसह दुसऱ्या आणि रोहित शर्मा 1011 धावांसह तिसरऱ्या स्थानी आहे. त्यामुळे त्याला हा विक्रम करण्याची संधी आहे.
येथे पाहता येणार तिसरा वनडे सामना :
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Third ODI on Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे. सामन्याची नाणेफेक दुपारी एकला होईल आणि या सामन्याला सुरुवात दुपारी दीडला होणार आहे. या सामन्याचे लाइव प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क होणार आहे. तसेच या सामन्याचे लाइव स्ट्रीमिंग हॉटस्टारवर देखील पाहू शकता.
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल , कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान, शाहरुख खान, ऋतुराज गायकवाड आणि शिखर धवन.
वेस्ट इंडिजचा संघ:
किरोन पोलार्ड (कर्णधार), फैबियन एलेन, नक्रमह बोनर, डैरेन ब्रावो, शमरह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाई होप (यष्टीरक्षक), अकील हुसन, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, निकोलस पूरन (उपकर्णधार), केमार रोच, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श जूनियर.