ETV Bharat / sports

IND VS SL : मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, पाहा व्हिडीओ - भारत वि. श्रीलंका एकदिवसीय मालिका २०२१

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड असलेला सूर्यकुमार यादव ‘ढगाला लागली कळ’ या दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर जिममध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळाला. सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

india cricketer suryakumar yadav workout on marathi song video went viral
IND VS SL : मराठी गाण्यावर सुर्यकुमार यादवचा वर्कआऊट, पाहा व्हिडीओ
author img

By

Published : Jun 26, 2021, 7:33 PM IST

मुंबई - शिखर धवनच्या नेतृत्वात भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. उभय संघातील या दौऱ्याला १३ जुलैपासून सुरूवात होत आहे. या दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव याचा देखील समावेश भारतीय संघात असून सूर्या फिटनेससाठी जीममध्ये घाम गाळताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सूर्या मराठी गाण्यावर वर्कआउट करत होता. याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा मुख्य संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान, भारताचा दुसरा संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आले असून या संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. चेतन सकारीया, देवदत्त पड्डीकल, नितिश राणा अशा बऱ्याच खेळाडूंचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड असलेला सूर्यकुमार यादव ‘ढगाला लागली कळ’ या दादा कोंडकेंच्या सुपरहिट गाण्यावर जिममध्ये वर्कआऊट करताना पाहायला मिळाला. सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सूर्या मुंबईचा रहिवाशी आहे. यामुळे त्याला मराठी भाषा समजते. तो अनेकदा मराठीत बोलताना देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे त्याला मराठी गाणी देखील आवडत असावीत, म्हणूनच तर तो मराठी गाणे लावून वर्कआऊट करत होता.

असा आहे भारताचा श्रीलंका दौरा

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेली सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी असा आहे भारतीय संघ -

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीष राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन साकरिया.

हेही वाचा - ९ चेंडूत पडल्या ५ विकेट, अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज, लॉर्ड्सवरचा थरारक सामना

हेही वाचा - बजरंग पूनिया वेदनेने विव्हळला, Tokyo Olympics आधी भारताला जबर धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.