राजकोट : राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील टी-20 मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिका संघाला 82 धावांनी ( India won by 82 runs ) पराभूत केले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना, 6 बाद 169 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाला 16.5 षटकांत सर्वबाद 87 धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाने मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली.
-
Wicket No. 2⃣ for @Avesh_6! 👏 👏@Ruutu1331 takes the catch in the deep as Rassie van der Dussen gets out. 👍 👍
— BCCI (@BCCI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/tNmH8e8kVr
">Wicket No. 2⃣ for @Avesh_6! 👏 👏@Ruutu1331 takes the catch in the deep as Rassie van der Dussen gets out. 👍 👍
— BCCI (@BCCI) June 17, 2022
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/tNmH8e8kVrWicket No. 2⃣ for @Avesh_6! 👏 👏@Ruutu1331 takes the catch in the deep as Rassie van der Dussen gets out. 👍 👍
— BCCI (@BCCI) June 17, 2022
Follow the match ▶️ https://t.co/9Mx4DQmACq #TeamIndia | #INDvSA | @Paytm pic.twitter.com/tNmH8e8kVr
टीम इंडियाच्या वतीने आवेश खानने गोलंदाजीत चमत्कार केला, ज्याच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आवेश खानने आपल्या कोट्यातील 4 बळी घेत आफ्रिकन संघाचे कंबरडे मोडले. त्याच्याशिवाय युझवेंद्र चहलनेही 2 महत्त्वाचे बळी घेत टीम इंडियाला मजबूत केले. याशिवाय अक्षर पटेल आणि हर्षल पटेल यांनीही 1-1 विकेट घेतली.फलंदाजी करताना आफ्रिकन संघाच्या केवळ 9 विकेट पडल्या, पण कर्णधार टेम्बा बावुमा रिटायर्ड हर्ट झाला हो. अशा स्थितीत आफ्रिकन संघ 9 विकेट्सवर ऑलआऊट मानला गेला आणि भारतीय संघाने सामना जिंकला.
-
.@Avesh_6 scalped 4⃣ wickets and was our top performer from the second innings of the fourth @Paytm #INDvSA T20I. 👏 👏 #TeamIndia
— BCCI (@BCCI) June 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A summary of his performance 🔽 pic.twitter.com/4ExtPvIlTB
">.@Avesh_6 scalped 4⃣ wickets and was our top performer from the second innings of the fourth @Paytm #INDvSA T20I. 👏 👏 #TeamIndia
— BCCI (@BCCI) June 17, 2022
A summary of his performance 🔽 pic.twitter.com/4ExtPvIlTB.@Avesh_6 scalped 4⃣ wickets and was our top performer from the second innings of the fourth @Paytm #INDvSA T20I. 👏 👏 #TeamIndia
— BCCI (@BCCI) June 17, 2022
A summary of his performance 🔽 pic.twitter.com/4ExtPvIlTB
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. ऋतुराज गायकवाड अवघ्या 5 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर 4 आणि इशान किशन 27 धावा करून बाद झाले. दरवेळेप्रमाणे ऋषभ पंत ( Rishabh Pant ) यावेळीही संघर्ष करताना दिसला. तो 23 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. भारतीय संघाने 81 धावांवर 4 विकेट गमावल्या.
हार्दिक पांड्या 31 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. पण त्याने संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. दिनेश कार्तिकनेही तुफानी फलंदाजी करत 26 चेंडूत अर्धशतक ( Dinesh Karthik half century )पूर्ण केले. यानंतर तो 27 चेंडूत 55 धावा करून बाद झाला. अक्षर पटेल 4 चेंडूत 8 धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 169 धावांपर्यंत पोहोचली. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 2 बळी घेतले. त्याचबरोबर मार्को, प्रिटोरियस आणिमहाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.