ETV Bharat / sports

India and Sri Lanka : तीन गडी राखून भारताचा श्रीलंकेवर विजय - अविष्का फर्नांडो याने 71 चेंडूत 50 धावा काढल्या

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्याला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेचा पहिला डाव 275 वर ओटोपला होता. भारतीय संघासाठी 276 धावांचे आव्हान सोपे वाटत असले तरी 24 ओव्हरमध्ये भारताने 5 गडी गमावून 142 धावा काढल्या आहेत. सध्याच्या घडीला श्रीलंकेचे सामन्यातील पारडे जड झाले आहे.

India and Sri Lanka
श्रीलंकेच्या डावाची डळमळीत सुरुवात
author img

By

Published : Jul 20, 2021, 6:11 PM IST

Updated : Jul 21, 2021, 9:09 AM IST

दीपक चहरने 64 चेंडुत दमदार अर्धशतक केले आहे. त्यामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सामना अटीतटीचा होत असताना भारताने विजय मिळविला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या वन डे सामन्याला सुरुवात झाली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका संघाने 9 गडी गमावत 50 षटकांमध्ये 275 धावा बनवल्या. जिंकण्यासाठी भारतासमोर 276 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेमधील पहिला सामना भारताने जिंकला होता.

श्रीलंकन संघाच्या डावाची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. 41 षटकांमध्ये 6 गडी गमावून श्रीलंका संघाची धावसंख्या 205 वर पोहोचली आहे. अविष्का फर्नांडो याने 71 चेंडूत 50 धावा काढल्या. मिनोद भानुका याने 36, धनंजय डिसिल्वा 32,वनायंडू हसरंगा 8, तर दसून शानाका याने 16 धावा काढल्या. चरित अस्लन्का याने 65 धावांची दमदार खेळी केली. चमिका करुनरत्ने यानेही चिवटपणे खेळत नाबाद 44 धावा बनवल्या. दुशमंता चमिरा याने 2 धावा केल्या.

युजवेंद्र चहलने 3 गडी बाद केले तर भुवनेश्वर कुमारनेही 3 गडी तंबूत परतवले. दीपक चहरने 2 गडी बाद केले.

भारतीय संघासाठी 276 धावांचे आव्हान सोपे वाटत असले तरी सुरवातीचे फलंदाज पृथ्वी शाह 13 धावावर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार शीखर धवनच्या खात्यावर 29 धावा जमा झालेल्या असताना तो झेलबाद होऊन परतला. इशान किशनकडून आज अपेक्षा असताना तो केवळ 1 धावेवर बाद झाला. त्यापाठोपाठ मनिष पांडे काही काळ मैदानात टिकून होता. मात्र 37 धावावर तो धावबाद झाला आणि भारतीय संघ डगमगला. त्यानंतर हार्दिक पांड्याने प्रेक्षकांची घोर निराशा केली. त्याला धावांचे खातेही उघडता आले नाही. अशा तऱ्हेने 24 ओव्हरमध्ये भारताने 5 गडी गमावून 142 धावा काढल्या आहेत. सध्याच्या घडीला श्रीलंकेचे सामन्यातील पारडे जड झाले आहे.

Last Updated : Jul 21, 2021, 9:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.