ETV Bharat / sports

Ind vs Eng : विराट कोहलीला बाद करण्याविषयी जेम्स अँडरसन म्हणाला, मी त्याला दाखवू इच्छितो... - Ind vs Eng

जेम्स अँडरसन याने ट्रेंट ब्रिज आणि लीड्स कसोटी सामन्यात विराट कोहलीला बाद केले. यानंतर त्याने जोरदार जल्लोष साजरा केला होता. याचे कारण अँडरसन याने सांगितलं आहे.

india and england : want-to-show-kohli-what-it-means-for-us-to-get-him-out-said-james-anderson
Ind vs Eng : विराट कोहलीला बाद करण्याविषयी जेम्स अँडरसन म्हणाला, मी त्या दाखवू इच्छितो...
author img

By

Published : Sep 2, 2021, 4:58 PM IST

Updated : Sep 2, 2021, 5:33 PM IST

टोकियो - जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांच्यातील द्वंद्व जगजाहीर आहे. या दोन दिग्गजांमधील टशन पाहण्यासाठी चाहते नेहमी आतूर असतात. इंग्लंड दौऱ्यात विराट-अँडरसन यांच्यात आमना-सामना होत आहे. पण यात विराट कोहली धावा करताना संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. दुसरीकडे जेम्स अँडरसन विराटवर भारी पडल्याचे चित्र आहे. आजपासून ओवलमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. या सामन्यात पुन्हा दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळेल.

जेम्स अँडरसन याने ट्रेंट ब्रिज आणि लीड्स कसोटी सामन्यात विराट कोहलीला बाद केले. यानंतर त्याने जोरदार जल्लोष साजरा केला होता. याचे कारण अँडरसन याने सांगितलं आहे. जेम्स अँडरसन याने इंग्रजी वृत्तपत्र द टेलीग्राफसाठी कॉलम लिहला आहे. यात तो म्हणतो, लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीला बाद केल्यानंतर मी खूप भावूक झालो होतो. हे ट्रेंट ब्रिज सारखं होतं. मला वाटतं त्याच्याविरुद्ध काही गोष्टी अतिरिक्त आहेत. कारण तो एक शानदार फलंदाज आहे. तसेच तो कर्णधार देखील आहे. तुम्ही पाहिलं असाल, जेव्हा भारतीय गोलंदाज विकेट घेतात, तेव्हा त्याचा विराटसाठी काय अर्थ होते. यामुळे मी त्याला दाखवू इच्छित आहे की, त्याला बाद करण्याची काय अर्थ होते.

पार्टरनशिपमध्ये गोलंदाजी करणे, सर्वात मोठे आव्हान असते. हेडिंग्लेमधील भारताचा दुसऱ्या डाव यासाठी मोठ उदाहरण आहे. मी सुरूवातीला विराटला फेकलेले 12 चेंडू पैकी 10 चेंडू त्याने सोडले. तेव्हा मला जो रूटने मला सांगितलं की, त्याला चेंडू खेळण्यासाठी भाग पाड. मी विराटला लय पकडू देऊ इच्छित नव्हतो, असे देखील जेम्स अँडरसन म्हणाला. दरम्यान, मागील काही काळापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. त्याला 2019 पासून एकही शतक झळकवता आलेले नाही. तो इंग्लंड दौऱ्यात देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.

हेही वाचा - Ind vs Eng : इंग्लंडने नाणेफेक जिंकली, भारताचा विजय पक्का?

हेही वाचा - विराट कोहलीची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण, कशी ठरते रॅकिंग?, जाणून घ्या

Last Updated : Sep 2, 2021, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.