वॉर्सेस्टर - भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात सीमारेषेजवळ हवेत सूर घेत अप्रतिम झेल टिपला. मंधानाने टिपलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्सेस्टर येथे हा सामना खेळला जात आहे.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा ३८व्या षटकादरम्यान, स्मृतीने हा झेल घेतला. दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर नॅट सिवरने पुढे येऊन जोरदार फटका मारला. हा चेंडू मिडविकेटच्या दिशेने हवेत गेला. तेव्हा स्मृतीने धावत येत सीमारेषेजवळ हवेत सूर घेत हा झेल घेतला. यामुळे सिवरची खेळी ४९ धावांवर संपुष्टात आली. स्मृतीने पकडलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी स्मृतीच्या झेलला 'कॅच ऑफ द सिझन' असे म्हटलं आहे.
-
WHAT A CATCH 😯
— Akash (@im_akash196) July 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Smriti Mandhana 🔥🔥#ENGvIND pic.twitter.com/xjrNSByrJ6
">WHAT A CATCH 😯
— Akash (@im_akash196) July 3, 2021
Smriti Mandhana 🔥🔥#ENGvIND pic.twitter.com/xjrNSByrJ6WHAT A CATCH 😯
— Akash (@im_akash196) July 3, 2021
Smriti Mandhana 🔥🔥#ENGvIND pic.twitter.com/xjrNSByrJ6
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्यात पावसाने हजेरी लावली. यामुळे हा सामना ४७ षटकाचा खेळवला जात आहे. यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २२० धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले आहे. इंग्लंडकडून नॅट सिवरने सर्वाधिक ४९ धावा केल्या. यात ५ चौकाराचा समावेश आहे.
झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम
भारतीय गोलंदाजी दरम्यान झूलन गोस्वामीने एक खास विक्रम आपल्या नावे केला. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २ हजाराहून अधिक षटके गोलंदाजी करणारी जगातील एकमात्र गोलंदाज ठरली. कसोटीत झूलनने ३४९, एकदिवसीयमध्ये १५०० हून अधिक तर टी-२० मध्ये २२५ षटके तिने फेकली आहेत.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.
हेही वाचा - भारतात उभारण्यात येत आहे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टेडियम, जाणून घ्या कधीपर्यंत होणार तयार
हेही वाचा - Ind W Vs Eng W ३rd ODI : झूलन गोस्वामीचा विश्वविक्रम, असा कमाल करणारी जगातील एकमेव गोलंदाज