ETV Bharat / sports

Shikhar Dhawan Statement : दुसऱ्या सामन्यातील विजयाचे श्रेय शिखर धवनने दिले आयपीएल क्रिकेटला - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज अपडेट्स

अष्टपैलू अक्षर पटेलच्या 64 धावांच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा दोन गडी राखून पराभव केला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यानंतर कर्णधार शिखर धवन ( Captain Shikhar Dhawan ) आणि अक्षर पटेलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

Shikhar Dhawan
Shikhar Dhawan
author img

By

Published : Jul 25, 2022, 7:45 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन: भारताचा कर्णधार शिखर धवन याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील संघाच्या यशाचे श्रेय आयपीएल क्रिकेटला दिले आहे. कारण त्यामुळे क्वीन्स पार्क ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या उच्च-स्कोअरिंग सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यात मदत ( IPL cricket prepare to chase big scores ) झाली. अष्टपैलू अक्षर पटेलच्या ( All-rounder Akshar Patel ) 64 धावांच्या जोरावर भारताने निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाचा दोन गडी राखून पराभव केला. यासोबतच संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणे नेहमीच कठीण -

या शानदार कामगिरीबद्धल धवनने अक्षरचे कौतुक ( Dhawan praised Axar ) करताना सांगितले की, 35 चेंडूत 64 धावांच्या त्याच्या शानदार फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिला, ज्यामध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांचा समावेश होता. तो म्हणाला की मला वाटते की ही संघाची उत्कृष्ट कामगिरी होती. आम्ही चुका केल्या, आम्ही आव्हाने स्वीकारली, ज्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. वनडेमध्ये 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणे नेहमीच कठीण असते.

फलंदाजांनी ज्या प्रकारे लक्ष्य गाठले ते मला आश्चर्य वाटले -

शेवटच्या 10 षटकात भारताला विजयासाठी 100 धावांची गरज होती. दीपक हुडा आणि अक्षर पटेल क्रीजवर होते. तेव्हा संघाच्या पाच विकेट होत्या. त्याचवेळी तो म्हणाला की, तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता ते पाहून आश्चर्यचकित झालो. तो पुढे म्हणाला की, फलंदाजांनी ज्या प्रकारे लक्ष्य गाठले ते मला आश्चर्य वाटले. आमच्या मिडल ऑर्डरला सलाम. सर्व फलंदाज उत्कृष्ट होते, मग तो अक्षर असो वा आवेश खान. शिखर पुढे ( Captain Shikhar Dhawan ) म्हणाला, संघाची सुरुवात संथ झाली, ज्याचा दबाव आम्हाला नंतर पाहायला मिळाला. संजू आणि श्रेयस चांगला खेळला. दोघांनी संघासाठी अर्धशतके झळकावली. संघातील सर्व खेळाडू सर्वोत्तम आहेत.

तसेच अक्षर पटेल म्हणाला, जेव्हा आपण प्रेक्षकांसमोर खेळतो तेव्हा आपल्याला आयपीएल क्रिकेटसारखे वाटते. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. मी आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळी खेळली. इथेही माझ्याकडे खूप वेळ होता, मला फलंदाजीची संधी मिळाली, जी आम्ही गमावली नाही. मात्र, गोलंदाजीदरम्यान पटेलने एकच विकेट घेतली. दोन्ही फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला 'मॅन ऑफ द मॅच' ( Axar Patel Man of the Match ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पटेल म्हणाला, ही खेळी माझ्यासाठी सर्वोत्तम होती. मला खेळण्यासाठी खूप वेळ मिळाला, ज्याचा मी फायदा घेतला आणि संघासाठी महत्त्वाच्या वेळी विजय मिळवून दिला.

हेही वाचा -Jos Buttler Statement : इंग्लंडच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बेन स्टोक्स पाठोपाठ बटलरही त्रस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.