ETV Bharat / sports

India West Indies Series : पहिल्या सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय - India West Indies

भारत वेस्ट इंडिज ( India West Indies ) दरम्यान तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय ( Thrilling Victory For India ) मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 308 धावा केल्या. भारतासाठी आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने ९७ धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने धवनला साथ देत ६४ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, तर श्रेयस अय्यरने ५४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाला 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करता आल्या.

India West Indies Series
India West Indies Series
author img

By

Published : Jul 23, 2022, 7:48 AM IST

Updated : Jul 23, 2022, 11:58 AM IST

पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने रोमहर्षक विजयाची ( Thrilling Victory For India ) नोंद करत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने ( Team India ) हा सामना तीन धावांनी जिंकला. या शानदार खेळीसाठी कर्णधार धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 7 गडी गमावून 308 धावा केल्या. भारतासाठी आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने ९७ धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने धवनला साथ देत ६४ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, तर श्रेयस अय्यरने ५४ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघाला 50 षटकांत 6 गडी गमावून 305 धावाच करता आल्या. वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. वेस्ट इंडिजने पाचव्या षटकातच स्टार सलामीवीर होपची विकेट गमावली. होपने अवघ्या 7 धावा केल्या, पण त्यानंतर ब्रूक्ससह मियर्सने आघाडी घेतली. ब्रूक्स आणि मिअर्समध्ये दुसऱ्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी झाली.

ब्रुक्सची विकेट घेत शार्दुल ठाकूरने ही भागीदारी तोडली. शेवटच्या 6 षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी 60 धावांची गरज होती. हुसेनसह किंगने या सामन्यात वेस्ट इंडिजला कायम ठेवले. पण चहलसमोर किंग फार काळ टिकू शकला नाही आणि 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सिराज, चहल आणि शार्दुल यांनी वेळोवेळी विकेट घेत भारताला सामन्यात पुनरागमन केले.

हुसेनने शेफर्डसह वेस्ट इंडिजला विजयाच्या अगदी जवळ आणले होते. शेफर्डने 39 आणि हुसेनने 33 धावांची नाबाद खेळी केली. भारताकडून सिराज, चहल आणि शार्दुल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रोमहर्षक सामना कधी भारताच्या कोर्टात तर कधी वेस्ट इंडिजमध्ये होताना दिसला आणि अखेरीस भारताने हा सामना 3 धावांनी जिंकून आपले नाव कोरले.

हेही वाचा - Neeraj Chopra : कमालच! नीरज चोप्राची एकदाच भालाफेक, पात्रता स्पर्धेत अंतिम स्थान

Last Updated : Jul 23, 2022, 11:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.