ETV Bharat / sports

IND vs WI 4th T20I : चौथ्या सामन्यात भारताने 59 धावांनी शानदार विजय, मालिकेत 3-1 ची विजयी आघाडी - IND vs WI 4th T20

IND vs WI 4th T20I : भारताने शनिवारी चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा एकतर्फी 59 धावांनी पराभव केल्याने पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

IND vs WI 4th T20I
IND vs WI 4th T20I
author img

By

Published : Aug 7, 2022, 7:33 AM IST

Updated : Aug 7, 2022, 7:58 AM IST

IND vs WI 4th T20I : भारताने शनिवारी चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांच्या जोरावर वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी पराभव केल्याने ५ सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ अशी अजेय आघाडी घेतली. भारताने 20 षटकांत 5 बाद 191 अशी भक्कम धावसंख्या उभारल्यानंतर वेस्ट इंडिजला 19.1 षटकांत 132 धावांवर रोखले. भारताकडून आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बाश्नोईने प्रत्येकी दोन बळी घेतले, तर अर्शदीप सिंगने १२ धावांत तीन बळी घेतले आहे. कर्णधार निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी 24- 24 धावा केल्या आहेत.

या अगोदर, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला. भारताने वेगवान सुरुवात करत 4.4 षटकात 53 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 16 चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या आहेत.

दीपक हुड्डाने 21 आणि ऋषभ पंतने 31 चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने 23 चेंडूंत नाबाद 30 आणि अक्षर पटेलने ८ चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 20 धावा केल्या आहेत. केवळ दिनेश कार्तिक ६ धावा करून बाद झाला आह. वेस्ट इंडिजकडून ओबेद मॅके आणि अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले आहेत.

हेही वाचा - Jagdeep Dhankhar Wins : जगदीप धनखड़ भारताचे नवे उपराष्ट्रपती.. मार्गारेट अल्वा यांचा पराभव

हेही वाचा - Faculty Unemployment : डॉक्टरेट प्राध्यापकांवर हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ; नेट सेट धारकांचा प्रश्न गंभीर

Last Updated : Aug 7, 2022, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.