अहमदाबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies ODI series) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना आज (रविवार) अहमदाबाद खेळला जात आहे. तसेच हा सामना भारतीय संघाचा 1000 वा एकदिवसीय सामना आहे. या सामन्यांतील नाणेफेक जिकूंन भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय (Captain Rohit Sharma bowling decision) घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी योग्य ठरवत भारतीय संघाला शानदार सुरुवात करुन दिली. त्यामुळे भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला 43.5 षटकांत सर्वबाद करत 176 धावांवर रोखले. तसेच आता भारतीय संघाला 177 धावांचे लक्ष्य (India need 177 runs to win) मिळाले आहे.
भारताला विजयासाठी 177 धावांची गरज -
नाणेपेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला पहिला धक्का शाय होपच्या रुपाने बसला. तो संघाची धावसंख्या 13 असताना तो मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजचा ब्रॅडन किंग हा 13 धावा काढून सुर्यकुमार यादवच्या हाती झेल देत, वाशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार किरोन पोलार्डला आपले खाते सुद्धा उघडता आले नाही. वेस्ट इंडिज संघासाठी सर्वाधिक जास्त धावांचे योगदान जेसन होल्डरने दिले. त्याने आपल्या खेळीत 71 चेंडूंचा सामना करताना 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. त्याचबरोबर फॅबियन अॅलेनने 29 धावांची खेळी करत त्याला साथ दिली. त्यामुळे वेस्ट वेस्ट इंडिजला 43.5 षटकांत सर्वबाद करत 176 धावा करता आल्या.
-
Four wickets for @yuzi_chahal as West Indies are bowled out for 176 in 43.5 overs.
— BCCI (@BCCI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/VNmt1PeR9o #INDvWI @Paytm pic.twitter.com/gDHCPVOPlQ
">Four wickets for @yuzi_chahal as West Indies are bowled out for 176 in 43.5 overs.
— BCCI (@BCCI) February 6, 2022
Scorecard - https://t.co/VNmt1PeR9o #INDvWI @Paytm pic.twitter.com/gDHCPVOPlQFour wickets for @yuzi_chahal as West Indies are bowled out for 176 in 43.5 overs.
— BCCI (@BCCI) February 6, 2022
Scorecard - https://t.co/VNmt1PeR9o #INDvWI @Paytm pic.twitter.com/gDHCPVOPlQ
भारतीय गोलंदाजांची शानदार गोलंदाजी -
-
And, 101 in quick succession 💪💪#INDvWI https://t.co/r2WqMVPbI4
— BCCI (@BCCI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">And, 101 in quick succession 💪💪#INDvWI https://t.co/r2WqMVPbI4
— BCCI (@BCCI) February 6, 2022And, 101 in quick succession 💪💪#INDvWI https://t.co/r2WqMVPbI4
— BCCI (@BCCI) February 6, 2022
भारताकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहलने सर्वाधिक 4 विकेट्स घेत 49 धावा दिल्या. त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात आपल्या 100 विकेट्स टप्पा पूर्ण केला आहे. वाशिंग्टन सुंदरने तीन गडी बाद केले. तसेच मोहम्मद सिराजने एक आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी दोन विकेट घेतल्या. भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना खुप महत्वाचा आहे. कारण हा सामना ऐतिहासिक आहे. भारताचा हा 1000 वा एकदिवसीय सामना (India's 1000th ODI Match) आहे. त्याचबरोबर भारत 1000 वनडे सामने खेळणार जगातील पहिला देश ठरला आहे.