ETV Bharat / sports

IND vs WI 1st ODI : भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेला आज पासून सुरुवात; टीम इंडियाची कमान धवनच्या हाती - क्रिडाच्या न्यूज

भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने करणार ( IND vs WI Series ) आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 22 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये मनोबल वाढवत पोहोचली आहे. भारताने अलीकडेच 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडचा 2-1 ने पराभव केला.

IND
भारत
author img

By

Published : Jul 22, 2022, 3:06 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन: गेल्या काही महिन्यांतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे, प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत आपले सर्वोत्तम खेळाडू वगळणे देशांसाठी आव्हान बनले आहे. विशेषत: यावर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाबाबत संघांनी आपली बेंच स्ट्रेंथ आजमावण्यास सुरुवात केली आहे. आज भारत आणि वेस्ट इंडिज संघात वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला ( IND vs WI 1st ODI ) जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होईल.

आज पासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाने आपला नियमित कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आता सलामीवीर शिखर धवनकडे ( Shikhar Dhawan has responsibility of captaincy ) सोपवण्यात आली आहे. तो यावर्षी भारताचे नेतृत्व करणारा सातवा कर्णधार असेल, जेव्हा तो पहिल्या वनडेसाठी मैदानात उतरेल. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंची उणीव असली तरी धवनच्या नेतृत्वाखालील पाहुण्या संघ वेस्ट इंडिजच्या संघर्षपूर्ण संघाविरुद्ध फेव्हरेट म्हणून उतरेल. इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि दीपक हुडा या खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची ही उत्तम संधी असेल.

वेस्ट इंडिजच्या खराब फलंदाजीला पाहता भारताकडे त्यांच्या गोलंदाजी आक्रमणातून निवडण्यासाठी अनेक पर्याय आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये, उपकर्णधार रवींद्र जडेजाच्या दुखापतीमुळे ( Ravindra Jadeja injured ) तो आज खेळण्याची शक्यता कमी आहे. फिरकी विभागात लेग-स्पिनर युझवेंद्र चहलच्या साथीने खेळण्याची शक्यता आहे. पांड्याच्या अनुपस्थितीत शार्दुल ठाकूरला वेगवान अष्टपैलू म्हणून संधी दिली जाऊ शकते, अर्शदीप सिंग पोटाच्या समस्येतून बरा होऊ शकला नाही, तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज किंवा आवेश खान हे दोन वेगवान गोलंदाज खेळू शकतात.

अलीकडेच गयाना येथे वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावल्यामुळे, नेदरलँड, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांतून विश्रांती घेतल्यानंतर आघाडीचा अष्टपैलू जेसन होल्डरचे पुनरागमन ( All-rounder Jason Holder Comeback ) हा एक मोठा बदल असेल. होल्डरच्या पुनरागमनामुळे सध्याचा कर्णधार निकोलस पूरनला एकदिवसीय फॉर्मेटमध्ये यजमानांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा मिळेल, जिथे तो पूर्ण 50 षटकांमध्ये फलंदाजी करू शकला नाही आणि महत्त्वपूर्ण भागीदारी करू शकला नाही.

वेस्ट इंडिज संघ : निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शामर ब्रूक्स, जेसन होल्डर, कीसी कार्टी, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स , रोमॅरियो शेफर्ड (राखीव) आणि हेडन वॉल्श जूनियर (राखीव).

भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

हेही वाचा - Neeraj Chopra : कमालच! नीरज चोप्राची एकदाच भालाफेक, पात्रता स्पर्धेत अंतिम स्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.