ETV Bharat / sports

IND vs SL 1st Test : विराट कोहली बाद होताच 'हे' ट्विट झाले व्हायरल ; वीरेंद्र सेहवागने देखील व्यक्त केले आश्चर्य - IND vs SL 1st Test

विराट कोहली आपल्या 100 व्या कसोटी ( Virat Kohli 100th Test ) सामन्यात 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली बाबत व्यक्त करण्यात आलेल्या भविष्यवाणीचे एक ट्विट व्हायरल होत आहे. ज्याबद्दल वीरेंद्र सेहवागने देखील आश्चर्य व्यक्त केले.

Virat Kohli
Virat Kohli
author img

By

Published : Mar 4, 2022, 8:01 PM IST

मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका ( IND vs SL ) संघात कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना आहे. या सामन्यात विराट कोहली आपल्या वैयक्तिक 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर आता विराट कोहलीच्या आउट होण्याबाबत केलेले भविष्यवाणीचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्याबद्धल वीरेंद्र सेहवागने देखील आश्चर्य व्यक्त केले आहे.

  • Kohli Won't score a 100 in his 100th test. Will score 45 (100) with 4 gorgeous cover drives and then Embuldeniya will knock his stumps over and he'll pretend to be shocked 😳😳 and will nod his head in disappointment

    — shruti #100 (@Quick__Single) March 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हायरला होत असलेल्या भविष्यवाणीच्या ट्विटमध्ये जसे लिहले होते, तेच आजच्या सामन्यात विराट कोहली सोबत झाले. श्रुती नावाच्या एका ट्विटर हँडलवरुन रात्री एक ट्विट करण्यात आले होते. ज्यामध्ये लिहले होते की, विराट कोहली आपल्या 100 व्या कसोटी ( Virat Kohli 100th Test ) सामन्यात शतक ठोकू शकणार नाही. त्याचबरोबर तो 4 कवर ड्राइवच्या साथीने 100 चेंडूत 45 धावा करेल. त्यानंतर एम्बुल्डेनिया त्याचा स्टंप उखडून टाकेल आणि तो आश्चर्यचकित होईल. तसेच तो निराशेने आपले डोके हलवेल.

दरम्यान या ट्विटमधील सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या नाहीत. परंतु यातील प्रमुख गोष्टी बघितल्या तर आश्चर्य वाटते. या सामन्यात विराट कोहलीने 75 चेंडूचा सामना करताना 45 धावा केल्या. त्यानंतर तो बाद झाला. या त्याच्या खेळीत त्याने 4 चौकार लगावले. विराटला बाद देखील त्याच गोलंदाजांने केले, ज्याचा नावाचा उल्लेख व्हायरल ट्विटमध्ये करण्यात आला होता. त्याचबरोबर विराट कोहली बोल्ड आउट होईल म्हणलेली भविष्यवाणी देखील खरी ठरली.

100 व्या कसोटी सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी विराट कोहलीला मुख्य कोच राहुल द्रविड यांच्या हस्ते 100 क्रमाकांची टोपी देण्यात आली. त्यावेळी विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती. यावेळी विराट कोहलीने आपल्या बालपणीच्या कोचचे आभार देखील मानले. तसेच आज झालेल्या सामन्या विराट कोहलीने 38 वी धाव घेत आपल्या आठ हजार धावांचा टप्पा देखील पूर्ण केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.