ETV Bharat / sports

IND Vs SL : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल, पाहा फोटो - rahul dravid

शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/28-June-2021/12293142_sl.jpg
IND Vs SL : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल, पाहा फोटो
author img

By

Published : Jun 28, 2021, 9:01 PM IST

कोलंबो - शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. भारताचा प्रमुख संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. यामुळे बीसीसीआयने दुसऱ्या फळीतील खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यावर पाठवले आहे. या संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी भारताचा महान खेळाडू राहुल द्रविड याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आलेले खेळाडू मागील काही दिवस मुंबईमध्ये क्वारंटाईन होते. आज सकाळी ते श्रीलंकेसाठी रवाना झाले होते. ते श्रीलंकेत दाखल झाले आहेत. २९ जून ते १ जुलै या कालावधीत ते हॉटेलमध्ये क्वारंटाईन असणार आहेत. त्यानंतर २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना टप्प्याटप्प्याने सराव करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तर ५ जुलैपासून ते एकत्र सराव करण्यास सुरुवात करतील. बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरून खेळाडू श्रीलंकेत दाखल झाल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे आहे. तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार उपकर्णधार आहे. भारताच्या या संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेल्या सहा खेळाडूंची निवड आहे. दरम्यान, भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ -

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

हेही वाचा - लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृती मंधानाचे क्यूट उत्तर

हेही वाचा - ENG vs SL : श्रीलंकन क्रिकेटपटूंची इंग्लंडच्या रस्त्यावर सिगारेट पार्टी; तिघांचे निलंबन, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.