ETV Bharat / sports

'राहुल द्रविड फक्त इंदिरानगरचा गुंडा नाही तर तो संपूर्ण भारताचा गुंडा' - भारत का गुंडा

राहुल द्रविडला जाहिरातीमुळे 'इंदिरानगरचा गुंडा' असे नवे नाव मिळाले. आता दीपक चहरने, राहुल द्रविड संपूर्ण 'भारताचा गुंडा' असल्याचे म्हटलं आहे.

ind vs sl : deepak chahar said rahul dravid isnt just indiranagar ka gunda but also india ka gunda
'राहुल द्रविड फक्त इंदिरानगरचा गुंडा नाही तर तो संपूर्ण भारताचा गुंडा'
author img

By

Published : Jul 22, 2021, 7:26 PM IST

कोलंबो - आयपीएल 2021 च्या हंगामातील पहिल्या सत्रामध्ये अनेक खेळाडूंनी चांगले प्रदर्शन करत आपली छाप सोडली. यादरम्यान, क्रिकेटप्रेमींना राहुल द्रविडचे 'गुंडा' रुप देखील पाहायला मिळाले. जे एका जाहिरातीतून समोर आले. जेव्हा द्रविडची ही जाहिरात समोर आली तेव्हा त्याला 'इंदिरानगरचा गुंडा' असे नवे नाव मिळाले. आता दीपक चहरने, राहुल द्रविड संपूर्ण 'भारताचा गुंडा' असल्याचे म्हटलं आहे.

दीपक चहरची भूरळ सद्या भारतीय चाहत्यांना पडली आहे. कारण दीपक चहरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. दीपक चहरने या सामन्यात नाबाद 69 धावांची खेळी केली. प्रशिक्षक राहुल द्रविडने दीपक चहरला वरच्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले. तेव्हा चहरने द्रविडचा विश्वास सार्थ ठरवत भारताला विजय मिळवून दिला.

भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना संपल्यानंतर दीपक चहरने पत्रकार परिषदेत चाहत्यांचे मनसोक्त मनोरंजन केले. त्याने द्रविडचे निकनेम इंदिरानगरचा गुंडावरुन भारताचा गुंडा असे ठेवले.

दीपक चहर पत्रकार परिषदेत म्हणाला, राहुल द्रविड सर हे फक्त इंदिरानगरचे गुंडा नसून ते संपूर्ण देशाचे गुंडा बनले आहेत. एवढे सांगून दीपक चहर मोठ्याने हसला. दरम्यान, राहुल द्रविड क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला खेळाडू आहे. त्याने खेळाडू ते प्रशिक्षक असा प्रवास केला आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात भारतीय अंडर 19 संघाने विश्वकरंडक जिंकला आहे. मागील काही वर्षांपासून तो भारतीय अ संघातील खेळाडूंचा मार्गदर्शक देखील आहे.

तुला शेवटपर्यंत खेळायचं आहे

श्रीलंका संघाने दिलेल्या 276 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ भारतीय संघाची अवस्था 193 वर 7 अशी झाली होती. भारतीय संघाला विजयासाठी आणखी 83 धावांची गरज होती आणि फक्त 3 गडी शिल्लक होते. अशात दीपक चहरने फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून बाहेर आले आणि त्यांनी राहुल चहरच्या हस्ते दीपक चहरला एक मॅजेस दिला. तुला शेवटपर्यंत खेळायचंय, सगळे चेंडू खेळून काढ, असा तो मॅसेज होता. द्रविडने सांगितल्याप्रमाणे दीपक चहरने अखेरपर्यंत मैदानात तळ ठोकत भारताला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला.

हेही वाचा - IND vs ENG : भारतीय संघाला जबर धक्का; आवेश खाननंतर आणखी एका खेळाडूला दुखापत

हेही वाचा - मी पण ब्राम्हण आहे, असे सांगून सुरेश रैना फसला; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.