लखनऊ - भारत आणि श्रीलंका (IND Vs SL 1st T-20) यांच्यातील तीन T-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ६२ धावांनी मात देत मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली. श्रीलंकेचा कप्तान दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज इशान किशन (८९) आणि श्रेयस अय्यर (५७) यांच्या वादळी खेळींमुळे भारताने २० षटकात २ बाद १९९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या चरिथ असलांकाशिवाय (नाबाद ५३) इतर खेळाडू धावा जमवण्यात अपयशी ठरले. त्यांना २० षटकात ६ बाद १३७ धावांपर्यंत पोहोचता आले.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज -
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी सध्या क्रिकेटच्या मैदानावर सगळे काही मनासारखे घडत आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचे कर्णधारपद त्याला मिळाले आहे. वनडे आणि टी 20 मध्ये भारताला सातत्याने विजय मिळत आहे. त्याशिवाय रोहित आपल्या बॅटनेही कमाल दाखवत आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
दीपक हुडाचे टी20 पदार्पण
वेस्ट इंडीजविरोधात एकदिवसीय सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दीपक हुडाचे आज टी-20 पदार्पण झाले आहे. दीपक हुडाने कॅरेबियन संघाविरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीच्या जोरावर महत्त्वपूर्ण धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना त्याने पहिली आंतरराष्ट्रीय विकेटही घेतली होती.
ऋतुराज गायकवाड बाहेर
ऋतुराज गायकवाड याने उजव्या हाताचे मनगट दुखत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाजीव होणारा परिणाम लक्षात घेता, तो पहिला टी20 सामना खेळू शकणार नाही आहे. सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे.
तर रोहित शर्मा कोहलीला मागे टाकेल
या सामन्यात रोहित शर्माने 37 धावा केल्या तर, तो मार्टिन गप्टिल आणि विराट कोहलीला मागे टाकत धावांच्या बाबतीत टी20 एक नंबरचा फलंदाज बनेल. तसेच, रोहित शर्माचा हा 123 वा सामना असेल. पाकिस्तानी किक्रेटर शोएब मलिक 124 सामने खेळत पुढे आहेत. या मालिकेतील तिन्ही सामने खेळल्यानंतर रोहित अव्वल स्थानी पोहचणार आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल