ETV Bharat / sports

IND vs SA T20 Series : सोळा वर्षातील भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टी-20 मधील कामगिरी, जाणून घ्या कोणाचे पारडे आहे भारी - cricket News

भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA ) यांच्यातील पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका गुरुवारपासून म्हणजेच 9 जूनपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघात कोणाचा वरचष्मा राहिला आहे, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

IND vs SA
IND vs SA
author img

By

Published : Jun 7, 2022, 4:17 PM IST

हैदराबाद : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 जूनपासून पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली ( IND vs SA T20 Series ) जाणार आहे. पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व टेंबा बावुमा करणार आहे. आता पर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात सोळा वर्षात 15 टी-20 आंतरराष्‍ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला आहे, ते आपण जाणून घेणार आहोत.

नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय संघाचा विक्रम चांगला राहिला आहे. T20 फॉरमॅटमध्ये भारताने येथे सलग 12 सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 13व्या विजयाचा विक्रम करण्याच्या इराद्याने येथे उतरणार आहे. तसे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले ( IND vs SA T20 Head to Head ) आहेत. ज्यापैकी भारताने नऊ सामने जिंकले आहेत, तर आफ्रिकेचा संघ सहा सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.

भारतातील यजमानांविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड प्रभावी ठरला आहे. संघाने भारतात चार T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले. भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2019 मध्ये खेळला गेला होता. ती तीन सामन्यांची मालिका होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. टीम इंडियाने दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना सात विकेटने जिंकला होता.

दक्षिण आफ्रिकेने तिसरा सामना नऊ गडी राखून जिंकला. तेव्हा भारतीय संघ 134/9 धावा करू शकला होता. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 17 व्या षटकात लक्ष्य गाठले. अशाप्रकारे भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विक्रम नक्कीच चांगला आहे, पण घरच्या मैदानावर प्रोटीज संघाविरुद्ध यजमान संघाचा विक्रम चांगला नाही. दोन्ही देशांमधील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली यांच्यात होणार आहे. यानंतर 12 जूनला कटक, 14 जूनला विशाखापट्टणम आणि 17 जूनला राजकोटमध्ये सामना होणार आहे. 19 जून रोजी बंगळुरू येथे अंतिम सामना होणार आहे.

केएल राहुलला भारतीय संघाने रोहित शर्माच्या गैरहजेरीत कर्णधार नियुक्त केले आहे. कारण या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिक, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांनी भारतीय संघात पुनरागमन केले आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून टेम्बा बावुमाची ( SA captain Temba Bavuma ) ही पहिलीच मालिका असेल.

हेही वाचा - IND vs SA 1st T20 :पहिल्या टी-20 सामन्याची तब्बल 'इतक्या' तिकिटांची झाली विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.